भारताच्या सुरक्षेसमोर पुन्हा एकदा अत्याधुनिक लढाऊ विमानांचा प्रश्न (advanced fighter jets) उभा राहिला आहे. भारतीय हवाईदल सध्या आपल्या स्क्वॉड्रनची कमतरता भरून काढण्यासाठी फ्रान्ससोबत Dassault Rafale या 114 फायटर जेट्सच्या खरेदीसाठी करार करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्याचवेळी पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट्सची कमतरता भारतासाठी मोठं आव्हान ठरत आहे. कारण आशियामध्ये चीन वेगाने आपली हवाई ताकद वाढवत आहे.

चीनच्या हवाईदलाकडे आधीपासूनच Chengdu J-20 आणि Shenyang J-35 सारखी अत्याधुनिक पाचव्या पिढीतील फायटर जेट्स आहेत. याशिवाय चीन पाकिस्तानसोबत देखील अशाच प्रकारच्या स्टेल्थ फायटर जेट्ससंदर्भात मोठी डील करू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. जर ही डील प्रत्यक्षात आली, तर पाकिस्तानच्या हवाई क्षमतेत मोठी वाढ होऊ शकते आणि त्यामुळे भारतासाठी सुरक्षा आव्हान आणखी गंभीर होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर भारतासाठी दोन मोठे पर्याय समोर आले आहेत. (advanced fighter jets) एकीकडे अमेरिकेने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील प्रसिद्ध Lockheed Martin F-35 Lightning II फायटर जेटची ऑफर दिली आहे, तर दुसरीकडे रशियानेही आपले अत्याधुनिक Sukhoi Su-57 स्टेल्थ फायटर जेट भारताला देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र भारताने अद्याप या दोन्ही पर्यायांबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, रशियाकडून भारताला (advanced fighter jets) एक आकर्षक प्रस्ताव देण्यात आला आहे. ‘डिफेन्स डॉट इन’ या वेबसाईटनुसार Wings India 2026 दरम्यान भारत आणि रशियाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत रशियाने भारताला Su-57 स्टेल्थ फायटर जेटचे अपडेटेड व्हर्जन ऑफर केले आहे. या ऑफरचे वैशिष्ट्य म्हणजे रशिया केवळ विमान विकणार नाही, तर त्यासोबत पूर्ण तंत्रज्ञान आणि सोर्स कोड देण्यासही तयार आहे.

यामुळे भारताला भविष्यात या विमानात स्वतःचे तांत्रिक बदल करण्याची मुभा मिळू शकते. यापूर्वी ज्या प्रकारे भारताला BrahMos आणि Astra मिसाईलच्या तंत्रज्ञानामध्ये सहकार्य मिळाले होते, त्याच धर्तीवर हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे.

अमेरिकेच्या F-35 फायटर जेटमध्ये सिंगल सीट व्यवस्था आहे, तर रशियाने (advanced fighter jets) भारताला ऑफर केलेले Su-57 चे अपडेटेड व्हर्जन डबल सीट असलेले आहे. रशियाच्या मते भविष्यातील युद्धात मानव आणि मानवविरहित प्रणालींच्या संयुक्त ऑपरेशनसाठी म्हणजेच MUM-T तंत्रज्ञानासाठी दुसरा क्रू सदस्य उपयुक्त ठरू शकतो.

या सर्व घडामोडींमुळे भारतासमोर मोठा धोरणात्मक निर्णय उभा राहिला आहे. अत्याधुनिक पाचव्या पिढीतील फायटर जेटची निवड करताना भारताला केवळ तांत्रिक क्षमता नाही, तर तंत्रज्ञान हस्तांतरण, उत्पादन आणि दीर्घकालीन रणनीती यांचा विचार करून पुढील पाऊल टाकावे लागणार आहे.

हेही वाचा :

युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान

वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या

कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *