राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी असलेले राधानगरी धरण 100 टक्के(dam) भरले आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला, आणि त्यानंतर काही वेळातच 3, 4 आणि 5 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला गेला. यामुळे धरणातून भोगावती नदीपात्रात 7 हजार 212 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे, ज्यामुळे नदीच्या पाणीपात्रात वाढ होणार आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुट 1 इंचावर पोहोचली आहे. कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरु असली, तरी धरण(dam) क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले असून, अनेक गावांचा थेट संपर्क तुटला आहे, ज्यामुळे काही गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कोल्हापूरकरांनी पुराच्या पाण्यामुळे संभाव्य नुकसानीसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
ऐश्वर्या रायसाठी मोठं गिफ्ट, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान बच्चन कुटुंबात ‘गुडन्यूज’
“बिहारला पूरस्थितीसाठी 18 हजार कोटी, महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का?”
टॉपलेस होऊन अंगाला गुलाब लपेटून ‘या’ अभिनेत्रीने चुकवला काळजाचा ठोका