वैद्यकीय शास्त्रानुसार, मृत्यूचे काही प्रकार असतात. तसेच, तज्ज्ञ म्हणतात की, मृत्यूपूर्वी आपल्या शरीरात काही बदल देखील होतात. तर मृत्यूनंतर काय होते आणि गरुड पुराण काय सांगते? याबद्दल जाणून घ्या…

मृत्यू कोणाला चूकलेला नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाला मृत्यूला सामारे जावेच लागते… मृत्यू हे निसर्गातील सर्वात अपरिहार्य सत्य आहे. (death) अनेक जण म्हणतात फक्त दोन गोष्टी एकत्र आल्या की मृत्यू निश्चित आहे, एक म्हणजे काळ आणि दुसरी म्हणजे वेळ… एखाद्या व्यक्तीचा काळ आणि वेळ एकत्र आली की, त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे… हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. वैद्यकीय शास्त्रानुसार, मृत्यूचे काही प्रकार असतात. तसेच, तज्ज्ञ म्हणतात की, मृत्यूपूर्वी आपल्या शरीरात काही बदल देखील होतात. मृत्यूनंतर काय होते? मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीला कोणत्या भावना येतात? आपल्या पुराणकथांमध्ये, विशेषतः गरुड पुराणात, या विषयांवर अनेक रंजक गोष्टी उघड झाल्या आहेत.

मृत्यूचे प्रकार: हिंदू धर्मग्रंथांनुसार, मृत्यूचे प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे.

वेळेवर मृत्यू: वेळेवर मृत्यू म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती त्याचे निर्धारित आयुष्य पूर्ण करते आणि वृद्धापकाळामुळे किंवा नैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडते.

अकाली मृत्यू: अपघात, आत्महत्या, खून किंवा आजारामुळे एखाद्याचे आयुष्य संपण्यापूर्वी होणाऱ्या मृत्यूला अकाली मृत्यू म्हणतात. (death) अशी देखील मन्यता आहे की अकाली मृत्यु पावणाऱ्या आत्म्यांना लवकर मोक्ष मिळत नाही.

मृत्यूपूर्वी होणारे बदल: मृत्यूच्या काही मिनिटे आधी, व्यक्तीमध्ये काही स्पष्ट बदल दिसून येतात. दृष्टी अंधुक होणे, बोलण्यात अडचण येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे हे लक्षण दिसून येते. गरुड पुराणानुसार, मरणाऱ्या व्यक्तीला त्याचे पूर्वज किंवा यमदूत दिसतात. असे म्हटले जाते की काहींना त्यांच्या चांगल्या कर्मांवर अवलंबून देवदूत दिसतात.

कर्मफलम् – यमलोकाचा प्रवास: आत्म्याने शरीर सोडल्यानंतर आत्म्याचा प्रवास त्या व्यक्तीने केलेल्या ‘कर्मांवर’ अवलंबून असतो. ज्या आत्म्यांनी चांगले कर्म केले आहे ते शांतीने जातात. (death) परंतु गरुड पुराण इशारा देते की ज्यांनी पाप केले आहे ते यमपुरीमध्ये पोहोचतील, जिथे त्यांना यमच्या राक्षसांकडून छळले जाईल. भक्तांचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतर केले जाणारे विधी आत्म्याला सांत्वन देतात.

हेही वाचा :

एप्रिलमध्ये तुमचं बँक खातं फ्रीज होणार? आर्थिक संकटामुळे सरकार तुमचे पैसे गोठवणार?

मोनालिसा लव्ह जिहादची शिकार? मुस्लीम बॉयफ्रेंडशी लग्न केल्याने दावा; नेमकं सत्य काय?

खेळपट्ट्यांबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, आता असं करता येणार नाही

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *