कोल्हापूरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी) मंदिर येथे सध्या (Temple) पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या संवर्धन, देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्यामुळे १४ मार्च ते १७ मार्च २०२६ या कालावधीत देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, भाविकांना देवीच्या उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाचे दर्शन घेता येणार आहे. (Temple)मंदिरातील दैनंदिन नित्य धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. १८ मार्च २०२६ पासून देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू होणार आहे. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घ्यावी, (Temple)असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?