इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 19 वा दिवस आहे. युद्ध अधिक घातक होत आहे. त्यामध्येच आता खळबळ उडाली. इराणकडून घातक हल्ले आखाती देशांवर केले जात आहेत. इराणच्या गॅस सुविधांवर हल्ला केल्याने इराण चेकाळला आहे.

अमेरिका आणि इराण युद्धाचा मोठा भडका उडाला आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. स्थिती अधिक गंभीर बनली आहे. इराणच्या गॅस सुविधांवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इराण अधिक घातक बनला असून इराणकडून कतारच्या रास लाफान औद्योगिक शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. गॅस प्रकल्पाला टार्गेट करून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर भारतालाही मोठा धक्का बसला. (conflict) कारण याच गॅस प्रकल्पातून भारता 47 टक्के एलपीजी गॅसचा पुरवठा होतो. रिफायनरीवरील हल्ल्यानंतर हे युद्ध अधिक भयंकर होताना दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणपुरते हे युद्ध आता मर्यादित राहिले नाही. थेट अनेक देशांना या युद्धाचा फटका बसत आहे. कतारमध्ये केलेल्या गॅसच्या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले. यानंतर कतार देखील आक्रमक होताना दिसत आहे.
इराणने केलेल्या गॅस प्रकल्पावरील हल्ल्यानंतर कतार आक्रमक झाला असून थेट 24 तासांच्या आत देश सोडण्याचे फरमानच काढले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, इस्लामी गणराज्यत इराणचे दूतावासाला एक पत्र पाठवले आहे. त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले की, कतारकडून दूतावासच्या जवळील सैन्य, सुरक्षा कर्मचारी यांच्यासोबतच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना पर्साेना नॉन ग्राटा म्हणून घोषित करत आहोत.
हेच नाही तर कतारने सांगितले की, 24 तासाच्या आत सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आमचा देश सोडावा लागेल. डिप्लोमसीमध्ये एखादा देश दुसऱ्या देशातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आपल्या देशात राहण्याची परवानगी देण्यास मनाई करतो त्यावेळी त्याला पर्साेना नॉन ग्राटा म्हटले जाते. कतारने इराणवर नाराज होऊन हा निर्णय घेतला. पुन्हा पुन्हा इराणककडून कतारला टार्गेट केले जात आहे. (conflict) त्यानंतर कतारकडून हा निर्णय घेण्यात आला. कतारकडून इराणला मोठा चेतावणी देण्यात आली.
जर इराणकडून असे हल्ले सुरूच ठेवण्यात आले तर कतारही इराणविरोधात पाऊले उचलेल. इराणकडून कतारसोबतच अनेक देशांना थेट धमकी देण्यात आली आहे. इराणने त्यांच्या गॅस सुविधांवर हल्ला केल्यानंतर म्हटले होते की, कतार, साैदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिरातच्या तेल आणि गॅसच्या प्रकल्पांवर हल्ले करेल. (conflict) त्यानंतर इराणकडून मोठे हल्लेही करण्यात आले.
हेही वाचा :
रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा
मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…
संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच