कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या निवडणुकीभोवती सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. सुमारे बाराशे दूध उत्पादक संस्थांच्या सभासदांना अपात्र करण्याच्या मुद्द्यावरून ही निवडणूक प्रक्रिया चर्चेत आली असून, त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या वेळापत्रकावर होताना दिसत आहे.

मतदार यादी संदर्भातील वादावर च्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी पार पडली. या प्रकरणात न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले (Kolhapur) असून, पुढील सुनावणी २५ मार्च रोजी होणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’ची निवडणूक लांबण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

या प्रकरणाची सुरुवात आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेतून झाली. (Kolhapur) त्यांनी काही दूध उत्पादक संस्थांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. संबंधित संस्थांवर अवसायनाची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा त्यांनी न्यायालयात मांडला आहे.दरम्यान, या घडामोडींमध्ये गोकुळचे प्रमुख नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयातील निर्णयानंतरच सर्किट बेंचमध्ये पुढील सुनावणी घेण्यात आली.

दुसरीकडे, दुग्ध विभागाच्या कार्यालयात हजाराहून अधिक दूध संस्थांकडून आलेल्या तक्रारी प्रलंबित आहेत. या तक्रारींवर नेमकी कोणती कारवाई करायची याबाबत विभाग सध्या संभ्रमात आहे. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा केली जात आहे.

निवडणूक प्रक्रियेचा विचार केला असता, ठराव संकलनासाठी सुमारे तीस दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर छाननी आणि हरकतींसाठी आणखी तीस दिवस जातात. (Kolhapur) त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ ठरणार असून, पावसाळ्यात मतदान होण्याची शक्यता टाळण्यासाठी निवडणूक पावसाळ्यानंतरच होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा

मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…

संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *