गेल्या दोन दिवसांपासून अशोक खरात हे चर्चेत आहेत. त्यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी खरात यांना अटक केली. आता या प्रकरणावर रुपाली पाटलांनी वक्तव्य करत रुपाली चाकणकरांवार खळबळजनक आरोप केले आहेत.

तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांना महिलांवर बलात्कार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्र-तंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचा अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने बुधवारी (१८ मार्च) पहाटे सुमारे तीन वाजता कारवाई करत अशोक खरात यांना ताब्यात घेतले. (police) त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर रुपाली पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले. त्या म्हणाल्या, “हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नाही, हा पूर्णपणे महिलांचा विषय आहे. एक वर्षापूर्वीच या प्रकरणाची वाचा फुटली होती. (police) तरीही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या ट्रस्टवर असल्यामुळे पोलीस कारवाई होत नव्हती का? ५८ व्हिडिओ सापडले आहेत, म्हणजे किमान ५८ महिलांवर अत्याचार झाला असण्याची शक्यता आहे. रूपाली चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे.”

रूपाली पाटील ठोंबरे पुढे म्हणाल्या, “सर्व संबंधित ट्रस्टवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. जर रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल. मी हा विषय सुनेत्रा पवार यांच्या कानावर घालणार आहे. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीमुळे तपास प्रभावित होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा.”

अशोक खरात यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ वर्षीय एका महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. अशोक खरात हे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ते मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाले असून, गेल्या काही वर्षांपासून ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते.

पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. या पेन ड्राइव्हमध्ये तब्बल ५८ व्हिडीओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. (police) यामुळे एकापेक्षा अधिक महिलांवर अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा

मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…

संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *