सध्या देशभरात एलपीजीच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना (shortage of LPG) करावा लागत आहे. अनेक ठिकाणी गॅससाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने या परिस्थितीची जबाबदारी विरोधकांवर ढकलली असली, तरी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडर नेहमीच 14.2 किलोचा का असतो, हा प्रश्नही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

खरं तर 14.2 किलो हा (shortage of LPG) आकडा कोणत्याही कायद्याने ठरवलेला नाही. मात्र, यामागे अनेक वर्षांपूर्वी ठरवलेले तांत्रिक आणि व्यवहार्य कारण आहे. भारतात घरगुती एलपीजीचा वापर सुरू झाला, तेव्हा गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांच्या सोयीचा विचार करून सिलेंडरचे वजन निश्चित केले. सिलेंडर सहज उचलता यावा, वाहतूक करता यावी आणि घरात हलवणे सोपे जावे, यासाठी 14.2 किलो गॅस योग्य मानला गेला.

रिकाम्या सिलेंडरचे वजन धरले, तर पूर्ण भरलेला सिलेंडर सुमारे 29 ते 30 किलोपर्यंत पोहोचतो. हे वजन सामान्य व्यक्तीला उचलता येईल, अशा मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जर गॅसचे प्रमाण वाढवले असते, तर एकूण वजन वाढून वापरात अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती.

याशिवाय, कुटुंबाच्या वापराचाही अभ्यास करण्यात आला होता. मध्यमवर्गीय कुटुंबाला (shortage of LPG) साधारण एका महिन्यासाठी पुरेल इतका गॅस या प्रमाणात मिळतो, असे निष्कर्ष समोर आले. त्यामुळे ग्राहकांना वारंवार सिलेंडर बदलण्याची गरज पडत नाही आणि पुरवठा व्यवस्थापनही सोपे होते.अनेक दशकांपासून हे मॉडेल प्रभावी ठरले असल्याने आजही 14.2 किलोचा सिलेंडरच मानक म्हणून वापरला जात आहे. त्यामुळे हा आकडा वेगळा वाटत असला, तरी त्यामागे ग्राहकांची सोय, सुरक्षितता आणि पुरवठा व्यवस्थेचा विचार केलेला आहे.

हेही वाचा :

रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा

मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…

संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *