गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात गुरुवारी मोठी (significant drop) घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दरांनंतर आज बाजारात अचानक झालेल्या या घसरणीमुळे खरेदीसाठी उत्सुक असलेल्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स (significant drop) असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात कमी झाला असून तो आज सुमारे १,५१,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. बुधवारी हा दर १,५४,८७९ रुपये होता, त्यामुळे एका दिवसातच सोन्याच्या किमतीत तीन हजार रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याच्या दरातही लक्षणीय घट झाली असून तो १,५१,०३० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. मागील दिवशी हा दर १,५४,२५९ रुपये होता.
१८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण कायम राहिली असून आज त्याची (significant drop) किंमत १,३८,८९९ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे. याआधी हा दर १,४१,८६९ रुपये होता. त्यामुळे सर्वच कॅरेटमध्ये सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. बुधवारी १ किलो चांदीचा भाव २,४९,९०७ रुपये होता, तो आज घसरून २,३६,८०९ रुपयांवर आला आहे. म्हणजेच एका दिवसात चांदीच्या दरात १३ हजार रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे. काही बाजारभावांनुसार चांदीचा दर २,३५,०५० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला असल्याचेही दिसत आहे.
गुढीपाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची खरेदी करण्याची परंपरा आहे. अशा वेळी दरात झालेली ही मोठी घसरण ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत असून ज्वेलर्सकडे खरेदीसाठी गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि डॉलरच्या मजबुतीमुळे या किमतीत बदल होत असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा :
रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा
मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…
संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच