सुरक्षित गुंतवणूक करून नियमित उत्पन्न मिळवण्याची इच्छा अनेकांची असते.(income) विशेषतः निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी लोक अशा योजनांचा शोध घेतात ज्यामध्ये जोखीम कमी आणि परतावा निश्चित असतो. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या लघुबचत योजना भारतीय गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यापैकी एक म्हणजे Senior Citizen Savings Scheme, जी निवृत्त व्यक्तींना नियमित उत्पन्न देण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सध्या सुमारे 8.2 टक्के वार्षिक व्याजदर दिला जातो, (income) जो अनेक बँकांच्या Fixed Deposit पेक्षाही जास्त मानला जातो. या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीची हमी सरकारकडून दिली जाते, त्यामुळे ही योजना पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. गुंतवणुकीची सुरुवात फक्त 1,000 रुपयांपासून करता येते, तर जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेतील गुंतवणुकीवर Income Tax Act च्या Section 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत करसवलत देखील मिळते
या योजनेत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक खाते उघडू शकतात. तसेच VRS घेतलेल्या व्यक्तींना 55 ते 60 वर्षे वयोगटातही खाते उघडण्याची परवानगी आहे. संरक्षण दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांना 50 वर्षांनंतरही या योजनेत गुंतवणूक करता येते. खाते सिंगल किंवा पती-पत्नीच्या नावाने जॉइंट पद्धतीने उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा असतो. या काळात गुंतवणुकीवर मिळणारे व्याज दर तीन महिन्यांनी (तिमाही) खात्यात जमा केले जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने जॉइंट अकाउंटद्वारे सुमारे 25 लाख रुपये गुंतवले, तर त्यावर मिळणाऱ्या व्याजातून दर तीन महिन्यांनी सुमारे 51,250 रुपये मिळू शकतात. ही रक्कम मासिक स्वरूपात मोजली तर सुमारे 17 हजार रुपये दरमहा उत्पन्न मिळू शकते.
पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला मूळ रक्कम परत मिळते.(income) तसेच इच्छेनुसार ही गुंतवणूक पुढील 3 वर्षांसाठी वाढवण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंतर, सरकारने नंतर व्याजदर बदलले तरी त्या गुंतवणुकीसाठी आधीचा व्याजदरच लागू राहतो. त्यामुळे ही योजना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी सुरक्षित आणि स्थिर पर्याय मानली जाते.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूजEdit