राजकीय वर्तुळात आणि (political) समाजमाध्यमांवर सध्या एका खास बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरल्याची माहिती समोर येत आहे.कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडणारा हा विवाह सोहळा खासगी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

मात्र लग्नानंतर तीन वेगवेगळ्या(political) ठिकाणी भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.लग्नाची नेमकी तारीख आणि ठिकाण याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली, तरी तयारी जोरात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पुणे, मुंबई आणि दिल्ली या तीन प्रमुख शहरांमध्ये रिसेप्शन होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
या आनंदाच्या बातमीमुळे कार्यकर्ते (political)आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. पुढील काही दिवसांत याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता असून, या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.