महाराष्ट्रातील नाशिक हे शहर धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशासाठी ओळखले जाते. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर वसलेले कपालेश्वर मंदिर हे असे एक अद्वितीय शिवमंदिर आहे, ज्याची परंपरा इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळी ठरते. देशातील बहुतेक प्रत्येक शिवमंदिरात शिवलिंगासमोर नंदी महाराजांची मूर्ती असते, मात्र कपालेश्वर मंदिरात ही परंपरा आढळत नाही. (Kapaleshwar) यामुळेच या मंदिराची ओळख देशभरात वेगळी निर्माण झाली आहे.

या मंदिराच्या वैशिष्ट्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, जी श्रद्धाळूंमध्ये विशेष महत्त्वाची मानली जाते. कथेनुसार, ब्रह्मदेवाला पाच मुख होते आणि त्यापैकी एक मुख सतत निंदा करत असे. (Kapaleshwar) त्यामुळे रागाच्या भरात भगवान शिवांनी त्या मुखाचा वध केला. मात्र या कृतीमुळे त्यांच्यावर ब्रह्महत्येचे पाप लागले. या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिव संपूर्ण ब्रह्मांडात भटकले, पण त्यांना कुठेही शांती मिळाली नाही.
अखेरीस ते सोमेश्वर येथे आले. तेव्हा एका नंदीने त्यांना रामकुंड येथे स्नान करण्याचा सल्ला दिला. भगवान शिवांनी रामकुंडात स्नान करताच त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. या घटनेनंतर भगवान शिवांनी नंदीला आपला केवळ वाहन न मानता गुरूचा दर्जा दिला.
याच कारणामुळे कपालेश्वर मंदिरात नंदीची मूर्ती स्थापित करण्यात आलेली नाही. असे मानले जाते की नंदी रामकुंड परिसरातच विराजमान आहेत आणि (Kapaleshwar) त्यामुळे मंदिरात त्यांच्या स्वतंत्र मूर्तीची आवश्यकता भासली नाही. ही परंपरा आजही जपली जात असून, भक्तांमध्ये याबद्दल विशेष श्रद्धा आहे.
कपालेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून, त्यामागील पौराणिक कथा, परंपरा आणि अनोखी वैशिष्ट्ये यामुळे ते नाशिकच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. देशभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि या अद्वितीय परंपरेचा अनुभव घेतात.
हेही वाचा :
6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज