इंधन दरवाढीचा भडका उडाला (Fuel) असून देशभरात प्रीमियम इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम आता ग्राहकांच्या खिशावर दिसू लागला आहे.भारतामध्ये तेल कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर सुमारे ₹2 ते ₹2.35 इतकी वाढ केली आहे.

यासोबतच औद्योगिक वापरासाठीच्या (Fuel)डिझेलच्या दरात तब्बल ₹20 ते ₹22 प्रति लिटर वाढ झाल्याने उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. जागतिक स्तरावर मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती $100 प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून भारतासारख्या आयातदार देशांमध्ये दरवाढ अपरिहार्य ठरत आहे.
दरम्यान, नियमित पेट्रोल आणि (Fuel)डिझेलचे दर बहुतांश शहरांमध्ये स्थिर ठेवण्यात आले असले तरी प्रीमियम इंधन वापरणाऱ्या वाहनधारकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
आजचे साधारण दर मुख्य शहरे – अंदाजे:मुंबई: पेट्रोल सुमारे ₹103.50 प्रति लिटर, डिझेल सुमारे ₹90 च्या आसपास दिल्ली: पेट्रोल सुमारे ₹94.77, डिझेल सुमारे ₹87.67 इंधन दर रोज सकाळी 6 वाजता बदलले जात असल्यामुळे स्थानिक कर आणि परिस्थितीनुसार शहरागणिक किंमतीत फरक (Fuel)दिसून येतो. दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम अन्नधान्य, प्रवास आणि इतर जीवनावश्यक वस्तूंवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.