कथित कॅप्टन, अंकशास्त्रज्ञ आणि(disgusting) ज्योतिषी अशोक खरात या भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या अटकेनंतर आता खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश होताना दिसत आहे. त्याच्या कृत्यांबद्दल रोज नवनवी माहिती समोर येत असून तुम्ही आम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशी काही कृत्य त्याने केली आहेत.

याप्रकरणावरून गुलाबी गँगच्या(disgusting) अध्यक्षा संगीता तिवारी चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी खरातवर गंभीर आरोप केले आहेत. खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा दावा काल त्यांनी केला होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आल्यावर टीकेची राळ उठली.

सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही (disgusting) चाकणकरांवर टीकास्त्र सोडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, अखेर काल रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवारांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. या संपूर्ण प्रकरणावरही संगीता तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *