इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून वाढत चाललेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने अनेक देशांप्रमाणे भारतालाही इंधन व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधन टंचाई टाळण्यासाठी ‘प्लॅन बी’ सक्रिय केल्याची माहिती समोर आली आहे. पर्यायी आयात व्यवस्थेवर भर देत भारताने विविध देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे. (global) विशेषतः रशिया कडून मोठ्या प्रमाणात तेल मागवले जात असून, यामुळे देशातील साठा मजबूत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, ‘अॅक्वा टायटन’सारखी मोठी तेलवाहू जहाजे भारताकडे वळवण्यात आली असून ती लाखो बॅरल कच्चे तेल घेऊन भारतीय बंदरांकडे येत आहेत. यापूर्वीही काही दिवसांत अनेक जहाजांद्वारे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू भारतात पोहोचवण्यात आले आहे. मुंद्रा पोर्ट येथे नुकतेच अशाच एका जहाजाने इंधनाचा मोठा साठा उतरवला.तज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील तणाव वाढल्याने होर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या मार्गावर परिणाम होण्याची शक्यता आहे, जो जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.(global) अशा परिस्थितीत भारताने विविध मार्ग आणि स्रोत वापरून पुरवठा सुरू ठेवण्याची रणनीती अवलंबली आहे.
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की देशात सध्या पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. दररोज सुमारे 55 लाख बॅरल तेलाची गरज असलेल्या भारताने साठा आणि आयात दोन्ही स्तरांवर तयारी वाढवली आहे. (global) त्यामुळे सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीतही देशात इंधन टंचाई होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज