नाशिकमध्ये अंकशास्त्रज्ञ आणि स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात (numerologist) प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या आडून महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे. या प्रकरणाचा तपास सध्या विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू असून, विविध धक्कादायक बाबी हळूहळू समोर येत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, (numerologist) खरातविरोधात लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगसंबंधी तक्रारींचा तपास सुरू आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधून यासंदर्भातील माहिती गोळा करण्यात येत आहे. त्याच्या कार्यालय आणि निवासस्थानावरून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप, संगणक, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, त्याच्या मोबाईलमधील कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) देखील तपासले जात आहेत.
दरम्यान, या प्रकरणात (numerologist) आतापर्यंत काही महिला पुढे येऊन तक्रार नोंदवली असून, आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक तपासात खरातने अनेक महिलांना फसवून, त्यांच्यावर मानसिक दबाव टाकून आणि अंधश्रद्धेचा आधार घेत शोषण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही प्रकरणांमध्ये संमोहन किंवा गुंगीची औषधे वापरल्याचाही आरोप आहे.
खरातने स्वतःला मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी म्हणून सादर करत, नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात ‘ओकस प्रॉपर्टी डीलर अँड डेव्हलपर्स’ या नावाने कार्यालय सुरू केले होते. याच ठिकाणी महिलांना बोलावून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटले आहेत. काही राजकीय नेत्यांसोबतचे (numerologist) त्याचे फोटो समोर आल्यानंतर टीकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.तपास यंत्रणांकडून सर्व पुरावे बारकाईने तपासले जात असून, पीडितांना न्याय मिळवून देण्यावर भर दिला जात आहे. या प्रकरणामुळे अंधश्रद्धा, विश्वासाचा गैरवापर आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा :
6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज