उत्सव, पार्ट्या आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये दारूला कोल्ड ड्रिंक, सोडा किंवा फ्रूट ज्यूस (habit of mixing) मिसळून पिण्याची सवय अनेकांमध्ये दिसून येते. हे मिश्रण चवीला छान लागते आणि त्यामुळे नशा लवकर चढते, असा समज प्रचलित आहे. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने ही सवय धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.कोल्ड ड्रिंक आणि अल्कोहोल या दोन्ही गोष्टी मूत्रवर्धक असल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होते. यामुळे डिहायड्रेशन होऊन थकवा, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक किंवा फ्रूट ज्यूसमधील जास्त साखर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवते, जे विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरते.

या मिश्रणामुळे नशा लवकर चढत (habit of mixing) असल्याने अनेकदा व्यक्तीला स्वतःची मर्यादा कळत नाही आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात दारू सेवन होते. याचा थेट परिणाम हृदयाच्या कार्यावर होतो. हृदयाची गती वाढणे, रक्तदाब वाढणे यासारखे त्रास निर्माण होऊ शकतात. एनर्जी ड्रिंकसोबत दारू घेतल्यास कॅफिनमुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि गंभीर परिस्थितीत हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. काही वेळा अशा प्रकारच्या मिश्रणामुळे व्यक्ती अचानक बेशुद्ध पडण्याच्या घटनाही घडतात.

तज्ज्ञांच्या मते, दारूचे सेवन करायचेच असल्यास ते मर्यादित प्रमाणात करणे महत्त्वाचे (habit of mixing) आहे. दारूमध्ये साखरयुक्त पेये मिसळण्यापेक्षा साधे पाणी किंवा कमी साखर असलेले पर्याय वापरणे तुलनेने सुरक्षित मानले जाते. तसेच, शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी वेळोवेळी पाणी पिणे आवश्यक आहे.क्षणिक आनंदासाठी केलेली ही सवय दीर्घकाळात यकृत, हृदय आणि पचनसंस्थेवर गंभीर परिणाम करू शकते. त्यामुळे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी दारूचे सेवन टाळणे किंवा अत्यंत मर्यादित ठेवणे हाच सर्वात योग्य मार्ग असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा :

6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज

द नाशिक एप्सटीन फाईल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *