महाराष्ट्रात भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने पुन्हा एकदा संतापाची (embroiled) लाट उसळली आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या प्रकरणात आता आणखी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील नीरज जाधवचा चेहरा उघड झाला असून, तो खरातच्या गैरकृत्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आरोप आहे.

पोलिस तपासात समोर (embroiled) आलेल्या माहितीनुसार, नीरज जाधव हा अशोक खरातच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. मात्र, त्याची भूमिका केवळ कार्यालयीन कामांपुरती मर्यादित नव्हती. महिलांचे शोषण होत असताना त्याने त्याचे व्हिडिओ चित्रित केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात १०० हून अधिक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून अनेक व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर येत आहे.

फेब्रुवारी महिन्यात एका पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या (embroiled) संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड झाला. त्यानंतर अशोक खरातविरोधात बलात्कारासह विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. सध्या तोही पोलिस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध घेत आहेत आणि आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक (embroiled) व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये अशोक खरात एका अल्पवयीन मुलीसोबत संशयास्पद कृती करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या नव्या खुलाशांमुळे प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली असून समाजात संताप व्यक्त केला जात आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे राज्य सरकारवरही विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. खरातचे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसोबतचे फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. सरकारने या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, तसेच पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा :

6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज

द नाशिक एप्सटीन फाईल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *