गॅस बुकिंगबाबत मोठा बदल समोर (regarding)आला असून आता अतिरिक्त सिलिंडर घेण्यासाठी तसेच नियमित बुकिंगसाठी काही नवीन नियम कडक करण्यात आले आहेत. सरकार आणि तेल कंपन्यांनी ग्राहकांची पडताळणी आणि गॅसचा गैरवापर थांबवण्यासाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेले नाही, त्यांना गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही, तसेच आधार आधारित पडताळणीही आवश्यक करण्यात आली आहे

विशेष म्हणजे, ज्या ग्राहकांनी(regarding)बराच काळ सुमारे 9 महिने गॅस बुकिंग केलेले नाही, त्यांना पुन्हा सिलिंडर मिळवण्यासाठी KYC पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे निष्क्रिय किंवा डुप्लिकेट कनेक्शन ओळखणे सोपे होणार आहेअतिरिक्त सिलिंडर किंवा दुसऱ्या बुकिंगसाठीही नियम बदलले असून आता एका सिलिंडरनंतर लगेच दुसरा सिलिंडर मिळणार नाही. किमान 21 ते 25 दिवसांचा गॅप ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे, काही ठिकाणी हा कालावधी ग्रामीण भागात 45 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे याशिवाय OTP आधारित डिलिव्हरी प्रणाली लागू करण्यात आली आहे.

म्हणजेच, तुमच्या मोबाईलवर (regarding)आलेल्या OTP शिवाय सिलिंडर दिला जाणार नाही, ज्यामुळे फसवणूक आणि गैरवापर कमी होणार आहे सरकारने आणखी एक मोठा बदल करत LPG आणि PNG पाईप गॅस कनेक्शन एकत्र तपासण्यास सुरुवात केली आहे. ज्या ग्राहकांकडे दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांना अतिरिक्त LPG सिलिंडर किंवा नवीन कनेक्शन घेण्यावर मर्यादा येऊ शकते या सर्व बदलांचा मुख्य उद्देश म्हणजे खऱ्या गरजू ग्राहकांपर्यंत गॅस पोहोचवणे, काळाबाजार रोखणे आणि सिस्टम अधिक पारदर्शक बनवणे हा आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत e-KYC पूर्ण करूनच गॅस बुकिंग करणे आवश्यक झाले आहे

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *