State Bank of India (SBI) ने मोठ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी (large investors) दिली आहे. बँकेने 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) वरील व्याजदरात 25 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.25 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. हे नवे दर 15 मार्च 2026 पासून लागू झाले असून, मोठ्या ठेवीदारांना आता अधिक परतावा मिळणार आहे. मात्र, 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर बँकेने कोणताही बदल केलेला नाही.

या निर्णयामुळे उच्च मूल्याच्या ठेवींमध्ये (large investors) गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होणार आहे. विशेषतः अल्पकालीन ते मध्यमकालीन एफडीमध्ये व्याजदर वाढवण्यात आले आहेत. 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीसाठी व्याजदर 5.10 टक्क्यांवरून 5.35 टक्के करण्यात आला आहे, तर 180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तो 5.60 टक्क्यांवरून 5.85 टक्के झाला आहे. याशिवाय, 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी व्याजदर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्के करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांनाही या बदलाचा लाभ मिळणार आहे. त्यांच्यासाठी 46 ते 179 दिवसांच्या एफडीवर व्याजदर 5.60 टक्क्यांवरून 5.85 टक्के झाला आहे. 180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी हा दर 6.10 टक्क्यांवरून 6.35 टक्के करण्यात आला आहे. तसेच, 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी व्याजदर 6.75 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, 3 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत. (large investors) 1 वर्षासाठी 6.25 टक्के, 2 वर्षांसाठी 6.40 टक्के, 3 वर्षांसाठी 6.30 टक्के, तर 5 आणि 10 वर्षांसाठी 6.05 टक्के व्याजदर कायम आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीही या श्रेणीत अनुक्रमे 6.75 टक्के ते 7.05 टक्क्यांपर्यंतचे दर पूर्ववत ठेवण्यात आले आहेत. SBI च्या या निर्णयामुळे मोठ्या गुंतवणूकदारांचा एफडीकडे कल वाढण्याची शक्यता असून, सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून एफडी पुन्हा एकदा आकर्षक ठरत आहे.

हेही वाचा :

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली

मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?

हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *