बॉलिवूडमध्ये रोमॅन्स, कॉमेडी आणि हॉररचा मिलाफ करून (experimenting)अनोखे प्रयोग करणाऱ्या मॅडॉक फिल्म्सने प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा प्रकल्प साकारला आहे. ‘स्त्री’, ‘स्त्री 2’ आणि ‘भेड़िया’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता त्यांनी ‘थामा’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित केला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट हॉरर आणि लव्हस्टोरी या दोन अगदी भिन्न शैलींचा संगम घेऊन येतोय.आयुष्मान–रश्मिकाची केमिस्ट्री या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना ही हॉट जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुमारे 1 मिनिट 49 सेकंदांचा टीझर घनदाट जंगलातून सुरू होतो.
हिरवळीच्या वातावरणात आयुष्मान आणि रश्मिका एकत्र वेळ घालवताना दिसतात. त्यावेळी बॅकग्राऊंडमध्ये एक आवाज येतो – “राहू शकशील माझ्याशिवाय? 100 वर्षं?” त्यावर रश्मिकाचं उत्तर असतं – “10 वर्षं काय, एक क्षणही नाही.(experimenting)” या गोड संवादानंतर लगेचच कथानकाला थरारक वळण मिळतं आणि रोमॅन्समधून हॉररची सुरुवात होते.

अंगावर काटा आणणारे सीन टीझरमध्ये असे अनेक दृश्य आहेत की, प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल. अचानक येणारे हॉरर ट्विस्ट, भीतीदायक पार्श्वसंगीत आणि थ्रिलर लूकमुळे या चित्रपटाचा अंदाज प्रेक्षकांना आधीपासूनच लागतो. यात मलायका अरोराच्या खास डान्सची झलक दिसते, ज्यामुळे ग्लॅमरचंही एक वेगळं लेव्हल अॅड झालं आहे. (experimenting)दमदार कलाकारांचा ताफा या चित्रपटात वेब सिरीज ‘पंचायत’ मधील ‘प्रह्लाद चा’ म्हणून प्रसिद्ध झालेला फैसल मलिक महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याशिवाय बॉलिवूडचे दिग्गज नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल देखील झळकणार आहेत. त्यामुळे चित्रपटाची स्टारकास्टच त्याला वेगळं वजन देते.

नवाजुद्दीनचा भयचकित करणारा डायलॉग टीझरच्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या भयानक लूकमध्ये दिसतात आणि म्हणतात –”गेल्या 75 वर्षांत कुठला रोमान्स पाहिलाच नाही मी… सुरू ठेवा.” हा डायलॉग ऐकल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच सिनेमाविषयी अधिकच उत्सुकता वाटू लागते.
पहिली हॉरर–लव्हस्टोरी या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. मॅडॉक फिल्म्सने या प्रकल्पाला त्यांचा पहिला हॉरर लव्हस्टोरी चित्रपट म्हणून सादर केलं आहे. इंस्टाग्रामवर टीझर शेअर करताना त्यांनी लिहिलं – “ना भीती इतकी शक्तिशाली होती, ना कधी प्रेम इतके खूनी.” दिवाळीत भेटणार थरारक कथा ‘थामा’ हा चित्रपट येत्या दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे फेस्टिव्ह सीझनमध्ये प्रेक्षकांना प्रेम, हॉरर, अॅक्शन आणि थ्रिलचा भन्नाट संगम अनुभवायला मिळणार आहे.
हेही वाचा :
Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी
मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
मृत्यूनंतरही यातना, अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ Video