येणाऱ्या 6 फेब्रुवारीला मराठी चित्रपटसृष्टीला ऐतिहासिक वळण देणारा भव्य चित्रपट (film) ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आग्रा मोहिमेवर आधारित हा चित्रपट केवळ युद्धकथा नसून शौर्य, मुत्सद्देगिरी आणि बुद्धिचातुर्याचा उत्कंठावर्धक प्रवास उलगडणारा ठरणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील (film) ज्येष्ठ अभिनेते पुनीत इस्सार यांची महत्त्वपूर्ण भूमिका. ते मिर्झा राजे जयसिंग यांची व्यक्तिरेखा साकारत असून त्यांच्या दमदार अभिनयामुळे या पात्राला वेगळी धार मिळाली आहे. महाभारतातील दुर्योधनासह अनेक लक्षवेधी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले पुनीत इस्सार या ऐतिहासिक भूमिकेत प्रभावी छाप पाडतील, अशी चर्चा आहे. भव्य सेट, प्रभावी पटकथा आणि तगडी कलाकार मंडळी यामुळे हा चित्रपट मराठी सिनेमातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मानले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट हा इतिहासातील अत्यंत नाट्यमय (film) आणि धाडसी प्रसंग मानला जातो. प्रतिकूल परिस्थितीतही महाराजांनी दाखवलेले धैर्य, नेतृत्व आणि रणनीती या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. त्यांच्या कणखर स्वभावाची, दूरदृष्टीची आणि चाणाक्ष धोरणांची झलक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. औरंगजेबासारख्या बलाढ्य सत्तेला शह देणाऱ्या शिवरायांची ही कहाणी नव्या पिढीलाही प्रेरणादायी ठरणार आहे.
अभिनेता (film) अभिजीत श्वेतचंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्यांच्या देहबोली, संवादफेक आणि अभिनयशैलीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. निर्माते आणि दिग्दर्शकांनी हा ऐतिहासिक अध्याय भव्य पडद्यावर आणताना मोठी मेहनत घेतल्याचे दिसून येते.
इतिहास, अभिमान आणि रोमांच यांचा संगम असलेला ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देईल, अशी खात्री चित्रपट टीमने व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम
8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग