भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल पुन्हा एकदा त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आलाय.(relationship)डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर त्याचे पर्सनल लाईफ सतत चर्चेत आहे. धनश्री हिच्यापासून वेगळं झाल्यानंतर चहल आरजे महवशसोबत स्पॉट झाला होता. ज्यामुळे ते डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान काही दिवसांपूर्वी चहल आणि महवशने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याचंही समोर आलं.अशातच चहल पुन्हा आता बिग बॉस १३ ची कंटेस्टंट शेफाली बग्गासोबत दिसला. शेफाली आणि चहलला एकत्र पाहून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. यावेळी हे दोघं डेट करत असल्याची अफवा पसरली होती.

यावेळी लोकांनी सोशल मीडियावर एक पोस्टर पोस्ट केलंय. चहल, शेफाली, धनश्री आणि (relationship)महवाश यांचा समावेश असलेलं एआय पोस्टर तयार सोशल मीडियावर व्हायरल झालंय. यावेळी पोस्टरवर ‘किस किसको प्यार करूं ३’ असं लिहिलंय. मात्र खरा ट्विस्ट तेव्हा आला ज्यावेळी या पोस्टवर स्वतः चहलने कमेंट केली.युजवेंद्र चहलच्या डेटिंगच्या अफवांदरम्यान ‘किस किसको प्यार करूं 3’ चे AI पोस्टर्स व्हायरल झाले. कपिल शर्माच्या ‘किस किसको प्यार करूं 2’ सारखाच हा लव्ह ट्राएंगल असल्याचं दिसतंय. ग्राफिक डिझायनर विजय कुमार बारियाने इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर केलं आणि चहलच्या नजरेतूनही ते सुटलं नाही.

या पोस्टवर चहलने मजेशीर कमेंट केली असून त्याने म्हटलंय, (relationship)”अजून २-३ राहिल्यात, अ‍ॅडमिन… पुढच्या वेळी चांगला रिसर्च करून या.” याचा अर्थ आणखी काही नावं घेतली नसल्याचं युजवेंद्रचं म्हणणं आहे. त्याची ही कमेंट देखील सध्या चांगलीच व्हायरल होतेय.धनश्री वर्माने अश्नीर ग्रोव्हरच्या ‘राईज अँड फॉल’ या शोमध्ये एक मोठा खुलासा केला होता. कुब्रा सैतशी बोलताना धनश्रीने म्हटलं होतं की, चहलने लग्नाच्या पहिल्या वर्षातच तिची फसवणूक केली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर तिला फसवणूक झाल्याचं समजलं होतं. धनश्रीच्या या वक्तव्याने सर्वच चाहते हैराण झाले होते.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *