आयपीएलच्या 19 व्या हंगामाची चाहूल (women’s cricket team’s) लागलेली असतानाच भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा निश्चित झाला आहे. 17 ते 27 एप्रिल दरम्यान रंगणाऱ्या या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मंधाना हिच्याकडे देण्यात आली आहे.

या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (women’s cricket team’s) एकूण पाच टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेतील चार सामने एकाच मैदानावर होणार असल्याने दोन्ही संघांचा प्रवासाचा ताण कमी होणार आहे. मालिकेची सुरुवात डरबन येथे होणाऱ्या पहिल्या दोन सामन्यांनी होईल. त्यानंतर तिसरा आणि चौथा सामना जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियमवर पार पडणार आहे. मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 27 एप्रिल रोजी बेनोनी येथील विलोमूर पार्क मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
संघ निवडीत काही महत्त्वाचे बदलही पाहायला मिळाले आहेत. प्रतिका रावल हिला या मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही, तर अमरावतीची खेळाडू भारती फुलमाळी हिला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न निवड समितीने केला आहे.
या दौऱ्यात हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष (women’s cricket team’s) यांसारख्या प्रमुख खेळाडूंवर संघाची जबाबदारी असणार आहे. गोलंदाजी विभागात रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी आणि श्रेयांका पाटील यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.आयपीएलच्या गडबडीत हा आंतरराष्ट्रीय दौरा रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. आगामी स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, दक्षिण आफ्रिकेच्या मैदानांवर चांगली कामगिरी करण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.
हेही वाचा :
राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली
मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?
हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?