आखाती भागातील तणावाचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही दिसू लागला असून कोल्हापुरमध्ये घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाल्यानंतर काही वितरक, एजंट आणि ग्राहक यांनी संगनमत करून घरगुती सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी जादा दराने विकण्याचा प्रकार सुरू केल्याचे उघड झाले आहे.

सध्या अनेक व्यावसायिकांना गॅसची तीव्र गरज असल्यामुळे या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. घरगुती वापरासाठी असलेले सिलिंडर १५०० रुपयांच्या आसपास खरेदी करून तेच सिलिंडर २२०० ते २५०० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. या व्यवहारातून मधल्या स्तरावर मोठा नफा कमावला जात असून हा प्रकार खुलेआम सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.
काही ठिकाणी ग्राहकांकडे अतिरिक्त सिलिंडर असल्याचा फायदा घेतला जात आहे. पाईप गॅस असलेले किंवा दोनपेक्षा जास्त सिलिंडर असलेले ग्राहक उरलेले सिलिंडर व्यावसायिकांना विकत असल्याचे समोर आले आहे. काहीजण सिलिंडरमधील शिल्लक गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरत असल्याचेही निदर्शनास आले आहे. (tension) तसेच बदली झालेल्या ग्राहकांकडील अर्धवट भरलेले सिलिंडरही या साखळीत वापरले जात असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, शहरातील अनेक गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. बुकिंग केल्यानंतरही १० दिवसांपेक्षा जास्त काळ गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषतः यल्लमा मंदिर परिसरातील वितरण केंद्रांवर पहाटेपासूनच ग्राहकांची गर्दी होत असल्याचे दिसून आले.
शासनाने व्यावसायिक गॅस पुरवठ्यास काही प्रमाणात परवानगी दिली असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. परिणामी, प्रामाणिक व्यावसायिक गॅस वितरक अडचणीत सापडले असून त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. (tension) शिवाय गॅस तुटवड्यामुळे व्यावसायिक ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणेही कठीण झाले आहे.
प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जात असली तरी अनेक ठिकाणी अनियमितता आढळत नसल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.(tension) त्यामुळे या संपूर्ण प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
दिवसभर थकवा का जाणवतोय? जाणून घ्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी?
पुन्हा युद्ध पेटणार? इराणने ऐकलं नाही तर… डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?
महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर