कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

राजकीय कथानकाची पार्श्वभूमी (directed)असलेला प्रकाश झा दिग्दर्शित आणि निर्मित “अपहरण”नावाचा चित्रपट काही वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर झळकून गेला होता. नाना पाटेकर आणि अजय देवगन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण दाखवले होते. पण आज कितीतरी चांगल्या गोष्टीचे अपहरण झालेले दिसेल. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांना साक्षी ठेवून चक्क लोकशाही व्यवस्थेचेच अपहरण झाले आणि या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशा एका वाक्यात गृह मंत्रालयाची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सांगून निर्णय क्षमतेचे अपहरण झाल्याची अप्रत्यक्ष कबुली घेऊन टाकली आहे.

अपहरण हे केवळ व्यक्तीचे (directed)होते असे नाही तर अनेक चांगल्या गोष्टींचे समाजातून अपहरण झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते.वृद्धाश्रमात वृद्धांची गर्दी असल्यामुळे नात्यांचे अपहरण झाले आहे . वाढत्या भ्रष्टाचारामुळे समाजातील सदाचाराचे अपहरण झाले आहे. नैतिक मूल्यांचे अपहरण झाले आहे. शेजार धर्माचे अपहरण झाले आहे. जात सलोख्याचे अपहरण झाले आहे. अधून मधून मानवतेचे अपहरण होते आहे. आणि आता कर्तव्य पालनतेचे अपहरण झाल्याची कबुली विधिमंडळात मंत्र्यांनीच दिली आहे.

शासन व्यवस्थेचा एक भाग (directed)असलेल्या पोलीस व्यवस्थेमधील शिस्तीचे अपहरण झाल्याचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रकार घडला आहे. प्रत्येकाला सत्ता हवी असते. आणि ती बहुमताच्या जोरावर मिळवावी लागते. “सत्तेसाठी काय पण”ही प्रवृत्ती गेल्या काही वर्षांपासून वाढू लागली आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे बहुमत होते. युती धर्माप्रमाणे शिवसेनेचा अध्यक्ष निवडला जाणे अपेक्षित होते. पण अध्यक्षपद भाजपाकडे आले. आणि त्यासाठी खेळले गेलेले डावपेच हे लोकशाहीला पायाखाली घेतल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाले.

सातारा जिल्हा परिषदेवर निवडून(directed) गेलेल्या सदस्यांपैकी शिवसेनेच्या दोघा सदस्यांवर काही वर्षांपूर्वीचा कुठलातरी एक गुन्हा दाखल होता. आणि निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच पोलिसांनी त्या दोन सदस्यांना अटक करून नेले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अल्पमतात गेली आणि भारतीय जनता पक्षाचे बहुमत झाले. असे काहीतरी घडणार आहे किंवा घडू शकते असा संशय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांना आला होता. त्यांनी एकनाथ शिंदे यांना सावध केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार जोशी यांना मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर योग्य ती कारवाई करा.

त्या दोन सदस्यांना मतदानापासून (directed)वंचित ठेवू नका असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. त्याच्या आधी त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना याविषयी सतर्क केले होते. दोघांनी असे काहीही घडणार नाही असे स्पष्ट शब्दात शिंदे यांना आश्वासित केले होते. तथापि जे होऊ नये असे वाटत होते नेमके तेच घडले. जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या त्या दोन सदस्यांनी फार गंभीर गुन्हा केलेला आहे असे समजून मतदान प्रक्रियेच्या आधी पोलिसांनी त्या दोघांना बळाचा वापर करून ताब्यात घेतले. याचा अर्थ साताऱ्याचे पोलीस भारतीय जनता पक्षाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दबावाखाली होते असा होतो. राज्याचे पोलीस महासंचालक, सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख”असे काही विपरीत घडणार नाही असा शब्द देतात”आणि त्यांच्या शब्दाला पोलीस व्यवस्थेमध्ये मान नाही असा एक संदेश सर्वसामान्य जनतेमध्ये जातो. पोलीस व्यवस्थेमध्ये शिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कर्तव्यात कसुरी इथे अपेक्षित नसते आणि नाही.

पण तरीही सातारा जिल्हा(directed) परिषद निवडणुकीच्या दरम्यान शिस्तीचेच अपहरण झालेले आहे असे म्हणता येईल. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याबद्दलची माहिती सांगताना पोलीस व्यवस्थेबद्दलची कैफियत मांडतात. ते अगतिक झाल्याचे दिसतात. शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, पण त्यांनाच बळाचा वापर करून बाजूला ढकलले जाते. त्यात ते किरकोळ जखमी होतात. जिल्हा परिषद आवारात राडा संस्कृतीचे दर्शन घडते. आणि गृहमंत्रालयाची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. घडलेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल एवढेच ते बोलतात. वास्तविक महायुती मधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रकरणाची सविस्तरपणे माहिती सभागृहाला देतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून कठोर कारवाईचे आदेश देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षित होते. चौकशी केल्यानंतर कारवाई ते करणार आहेत. म्हणजे त्यांचा चौकशीवर विश्वास आहे, मंत्री मंडळातील सहकारी मंत्र्यांवर ते विश्वास ठेवत नाहीत.

भारतीय जनता पक्षाला सातारा(directed) जिल्हा परिषदेमध्ये स्वतःचा अध्यक्ष बनवायचा आहे आणि होता. त्यासाठी पोलीस यंत्रणा त्यांना हवी तशी राबवायची होती. आणि तशी ती राबवली गेली. बहुमत असूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाअगदी ठरवून अल्पमतात आणले गेले.” सत्तेसाठी काय पण”इतक्या खालच्या थरापर्यंत साताऱ्यात राजकीय नाट्य घडले. त्याला राजकीय अपहरण असे म्हणता येईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *