देशात डिजिटल व्यवहारांची झपाट्याने वाढ होत असताना (transactions) ग्राहकांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देत Reserve Bank of India (RBI) ने ऑनलाइन पेमेंटसाठी मोठा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२६ पासून देशभरात ऑनलाइन व्यवहारांसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अनिवार्य करण्यात येणार आहे. या नव्या नियमानुसार कोणतेही डिजिटल पेमेंट पूर्ण करण्याआधी वापरकर्त्यांना किमान दोन पातळ्यांवर आपली ओळख पडताळून दाखवावी लागणार आहे.

नवीन प्रणालीअंतर्गत ग्राहकांना (transactions) पेमेंट करताना पासवर्ड, पिन, ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी यांसारख्या पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. म्हणजेच, फक्त एकाच माध्यमावर आधारित पडताळणी न करता अधिक सुरक्षिततेसाठी अतिरिक्त स्तर जोडले जाणार आहेत. यामुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली असली तरी त्याचबरोबर सायबर फ्रॉड आणि स्कॅमच्या घटनाही वाढल्या आहेत. ओटीपीवर आधारित व्यवहारही पूर्णपणे सुरक्षित राहिलेले नाहीत, कारण काही प्रकरणांमध्ये हॅकर्स ओटीपी मिळवून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर RBI ने अधिक कडक सुरक्षा उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नव्या नियमानुसार जर एखादा व्यवहार आवश्यक सुरक्षा (transactions) नियमांचे पालन न करता पूर्ण झाला आणि त्यात फसवणूक झाली, तर त्याची जबाबदारी संबंधित बँक किंवा कंपनीवर राहणार आहे. त्यामुळे वित्तीय संस्थांवर सुरक्षित पेमेंट व्यवस्था उभारण्याचा दबाव वाढणार आहे आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण अधिक मजबूत होणार आहे.
याशिवाय RBI ने ‘रिस्क बेस्ड ऑथेंटिकेशन’ ही संकल्पनाही (transactions) लागू केली आहे. म्हणजेच प्रत्येक व्यवहाराच्या स्वरूपानुसार आणि रकमेच्या आधारे सुरक्षा पातळी निश्चित केली जाईल. लहान रकमेच्या व्यवहारांसाठी कमी पडताळणी तर मोठ्या व्यवहारांसाठी अधिक कडक पडताळणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठीही अशाच प्रकारचे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा असून, ग्राहकांचा ऑनलाइन व्यवहारांवरील विश्वास आणखी बळकट होणार आहे.
हेही वाचा :
राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली
मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?
हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?