अनेकांच्या घरी आता नॉन-स्टिक भांडी आणि प्रेशर कुकर असते. पण पूर्वी अनेक जण मातीच्या भांड्यात जेवण शिजवायचे… ज्याचा फायदा आरोग्याला देखील व्हायचा…

आता बाजात अनेक प्रकारची भांडी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तवे, टोप अशा अनेक प्रकारचे भांडी आपण विकत घेतो आणि आवडीने त्यामध्ये स्वयंपाक करतो. पण कोटींग असलेली भांडी आरोग्यास लाभदायक आहेत की नाही याबद्दल आपल्याला कोणतीच कल्पना नसते. (clay pots) म्हून जूने ते सोने म्हणतात ते अगदी खरं आहे… पूर्वी मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवले जायचे… जे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक होते… पण आता परिस्थिती वेगळी आहे. आधुनिक स्वयंपाकघरांमध्ये नॉन-स्टिक भांडी आणि प्रेशर कुकर आले असले तरी, मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाची चव आणि गुणवत्ता आजही उठून दिसते.

तज्ज्ञांच्या मते, मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने केवळ अन्नाची चवच वाढत नाही, तर ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते. मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न अधिक चविष्ट लागण्यामागे अनेक मुख्य कारणे आहेत. माती नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असते. ती अन्नातील आम्लतेवर प्रतिक्रिया करून योग्य पीएच पातळी राखते. (clay pots) यामुळे पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होते.मातीच्या भांड्यात अन्न हळूहळू शिजते. त्यामुळे, ओलावा टिकून राहत असल्याने, जास्त तेल न वापरताही स्वादिष्ट पदार्थ बनवता येतो. मातीच्या बारीक छिद्रांमधून हवा आणि उष्णता योग्य प्रकारे खेळती राहते. यामुळे अन्नातील पोषक तत्वे टिकून राहण्यास मदत होते.

मातीच्या भांड्यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि गंधक यांसारखी खनिजे स्वयंपाकाद्वारे अन्नामध्ये हस्तांतरित होणे फायदेशीर ठरते. जर नवीन मातीचे भांडे थेट ओव्हनमध्ये ठेवले, तर ते फुटण्याची शक्यता असते. नवीन भांडे 12 ते 24 तास साध्या पाण्यात भिजवून ठेवा.

पाण्यातून बाहेर काढल्यानंतर, भाताचे पाणी भांड्यात ओता आणि 2 – 3 दिवस तसेच ठेवा. (clay pots) यामुळे भांड्याची छिद्रे बंद होण्यास आणि त्याची मजबुती वाढण्यास मदत होईल. भाताचे पाणी काढून टाकल्यानंतर, भांडे व्यवस्थित कोरडे करा, आतून आणि बाहेरून थोडे खोबरेल तेल लावा आणि उन्हात वाळवा. भांडे पहिल्यांदा ओव्हनमध्ये ठेवताना, फक्त मंद आच वापरा. ​​कांदा परतल्याने भांड्यातील चिकणमाती निघून जाण्यास मदत होईल. मातीच्या भांड्यात जेणव बनवण्याचे अनेक फायदे आहेत.

हेही वाचा :

दिवसभर थकवा का जाणवतोय? जाणून घ्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी?

पुन्हा युद्ध पेटणार? इराणने ऐकलं नाही तर… डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?

महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *