एप्रिल महिना जवळ आला की देशभरात उन्हाचा चटका वाढू लागतो आणि अशा वेळी अनेकजण थंड हवामान असलेल्या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करतात. यंदाही सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचा कल निसर्गरम्य आणि थंड हवेच्या पर्यटनस्थळांकडे वाढताना दिसत आहे. भारतात एप्रिलमध्ये फिरण्यासाठी अनेक उत्तम पर्याय उपलब्ध असून, काही ठिकाणे विशेष आकर्षण ठरत आहेत.

‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हणून ओळखला जाणारा Kashmir एप्रिलमध्ये अधिकच खुलतो. श्रीनगरमधील प्रसिद्ध या काळात रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला असतो. आणि येथे थंडावा आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव मिळतो. दाल सरोवरातील शिकाऱ्यांची सफर पर्यटकांना वेगळाच आनंद देते.

हिमाचल प्रदेशातील हे देखील एप्रिलमध्ये पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरते. हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित शिखरे आणि मधील पॅराग्लाइडिंगसारखे साहसी खेळ पर्यटकांना आकर्षित करतात. (trip) येथे अजूनही बर्फाचा आनंद घेता येतो.ईशान्य भारतात निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर हा उत्तम पर्याय आहे. आणि परिसरातील बौद्ध मठ पर्यटकांना शांततेचा अनुभव देतात. कांचनजंगा पर्वतरांगांचे दृश्यही येथे मोहक दिसते.

दक्षिण भारतात थंड हवामानाचा अनुभव घ्यायचा असेल तर केरळमधील पर्यटकांसाठी आदर्श ठिकाण आहे. चहाचे मळे, धुके आणि हिरवेगार डोंगर यामुळे येथे निसर्गरम्य वातावरण निर्माण होते. आणि ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.तसेच तमिळनाडूमधील एप्रिलमध्ये ‘डोंगरांची राणी’ म्हणून पर्यटकांना आकर्षित करते. (trip) येथे होणारा फ्लॉवर शो, बोटॅनिकल गार्डन आणि निलगिरी पर्वतरांगांमधून धावणारी टॉय ट्रेन हा एक खास अनुभव ठरतो.

याशिवाय अध्यात्म आणि साहस यांचा संगम अनुभवायचा असेल, तर उत्तराखंडमधील हे ठिकाण योग्य आहे. गंगा नदीत रिव्हर राफ्टिंग, संध्याकाळची गंगा आरती आणि ध्यानधारणा (trip) यामुळे मनाला शांती मिळते.एकूणच, एप्रिल महिन्यात भारतातील ही पर्यटनस्थळे केवळ उष्णतेपासून दिलासा देत नाहीत, तर निसर्ग, साहस आणि अध्यात्माचा अनोखा संगमही अनुभवायला देतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी ही ठिकाणे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

हेही वाचा :

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली

मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?

हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *