घरात अचानक गॅस संपला आणि(situations)स्वयंपाक थांबला अशी परिस्थिती अनेकदा येते. मात्र काळजी करण्याची गरज नाही. इंडक्शनवरही डाळ अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन शिजवता येते, हे अनेकांना माहिती नसते.सध्या अनेक घरांमध्ये इंडक्शनचा वापर वाढत आहे. गॅस नसताना किंवा वेळ वाचवायचा असेल तर इंडक्शन उत्तम पर्याय ठरतो. डाळ शिजवण्यासाठी सर्वप्रथम तूर डाळ किंवा मूग डाळ स्वच्छ धुऊन घ्या आणि 10-15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.

त्यामुळे डाळ लवकर शिजते.(situations)यानंतर इंडक्शनवर प्रेशर कुकर ठेवा. त्यात डाळ, पाणी, हळद आणि चिमूटभर मीठ घालून झाकण लावा. इंडक्शनवर मध्यम ते हाय तापमानावर 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या. गॅसप्रमाणेच इंडक्शनवरही कुकर उत्तम काम करतो, फक्त तापमान योग्य ठेवणे महत्त्वाचे असते.जर कुकर नसेल तर थेट भांड्यातही डाळ शिजवता येते. त्यासाठी डाळ आणि पाणी घालून इंडक्शनवर उकळी येईपर्यंत हाय तापमानावर ठेवा, नंतर कमी तापमानावर ठेवून झाकण लावून शिजू द्या. मध्ये मध्ये हलवत राहिल्यास डाळ खाली लागत नाही.डाळ शिजल्यानंतर त्यात फोडणी दिल्यास चव अजून वाढते.
इंडक्शनवरच छोट्या पॅनमध्ये (situations)तेल गरम करून मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता आणि लाल मिरची टाकून फोडणी तयार करा आणि ती डाळीत मिसळा.गॅस संपला तरी स्वयंपाक थांबवण्याची गरज नाही. इंडक्शनच्या मदतीने रोजचे पदार्थही सहज बनवता येतात, हे आता स्पष्ट होत आहे.