अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला (remains tense) तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला असला तरी परिस्थिती अजूनही तणावपूर्णच आहे. सततच्या हवाई हल्ले आणि लष्करी कारवायांमुळे इराणचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून इराणसाठी सहानुभूती व्यक्त केली जात असताना भारतातूनही मानवतावादी मदतीचा ओघ वाढताना दिसत आहे.

विशेषतः जम्मू आणि काश्मीर मधून मोठ्या (remains tense) प्रमाणात मदत पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांनी आर्थिक मदत केली असून काही नागरिकांनी आपले सोन्या-चांदीचे दागिनेही इराणसाठी दान केले आहेत. या मदतीबद्दल इराणने सुरुवातीला सोशल मीडियावरून भारत आणि काश्मीरमधील जनतेचे आभार मानले होते. एका पोस्टमध्ये भारतीयांच्या सहानुभूतीचा उल्लेख करत ती इराणसाठी ऊर्जा देणारी असल्याचेही म्हटले गेले होते.
मात्र या घटनेनंतर अचानक वळण आले. काही पाकिस्तानी वापरकर्त्यांकडून काश्मीरच्या मुद्द्यावर आक्षेप नोंदवल्यानंतर भारतातील इराण दूतावासाने ती आभार व्यक्त करणारी पोस्ट हटवल्याचे समोर आले आहे. यामुळे सोशल मीडियावर नाराजीची लाट उसळली असून इराणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
काश्मीरमधून मोठ्या प्रमाणावर मदत मिळाल्यानंतरही इराणने आपली भूमिका (remains tense) बदलल्याचे दिसत असल्याने अनेकांनी याला ‘दुटप्पीपणा’ असे संबोधले आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे भारत-इराण संबंधांवरही चर्चा सुरू झाली आहे. युद्ध सुरू असतानाच अशा प्रकारच्या राजनैतिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
दिवसभर थकवा का जाणवतोय? जाणून घ्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी?
पुन्हा युद्ध पेटणार? इराणने ऐकलं नाही तर… डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?
महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर