दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये सोमवारी घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हवाई दलाचे C-130 हे लष्करी विमान कोसळल्याने आतापर्यंत ६६ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, (Colombia) तर अनेक जण जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान सुमारे १२५ सैनिकांना घेऊन उड्डाण करत होते. उड्डाणानंतर काही क्षणांतच विमानाचा ताबा सुटला आणि ते पेरू सीमेजवळील परिसरात कोसळले. दुर्घटनेनंतर विमानाला भीषण आग लागल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली.

सुदैवाने हे विमान मानवी वस्तीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर कोसळल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. (Colombia) तरीही या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर सैनिकांचा मृत्यू झाल्याने कोलंबियाच्या लष्करात शोककळा पसरली आहे. घटनेनंतर तातडीने बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना बाहेर काढण्याचे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या अपघाताचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून (Colombia) त्यातून दुर्घटनेची तीव्रता लक्षात येत आहे. दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा :

दिवसभर थकवा का जाणवतोय? जाणून घ्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी?

पुन्हा युद्ध पेटणार? इराणने ऐकलं नाही तर… डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?

महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *