भारतातील मद्यप्रेमींसाठी एक (beware)महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांत बिअर आणि इतर मद्याच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे मद्य उत्पादक कंपन्यांनी राज्य सरकारांकडे दरवाढीची मागणी केली आहे.

त्यामुळे जर सरकारने परवानगी (beware)दिली तर मद्यप्रेमींना लवकरच अधिक पैसे मोजावे लागू शकतात.विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात बिअरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. अशा परिस्थितीत जर उत्पादन खर्च वाढला आणि पुरवठ्यावर परिणाम झाला, तर बाजारात तुटवडा निर्माण होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मद्य उद्योगात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही आठवड्यांत मद्यनिर्मितीसाठी लागणाऱ्या पॅकेजिंग साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे
काचेच्या बाटल्यांच्या किमती (beware)तब्बल २० टक्क्यांनी वाढल्या असून पॅकिंग मटेरियलमध्येही १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर ॲल्युमिनियमच्या कमतरतेमुळे बिअर कॅन्सच्या उपलब्धतेवरही परिणाम होत असल्याचे दिसत आहे. याशिवाय इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक खर्च देखील वाढला आहे. वाहतूक खर्चात सुमारे १० टक्क्यांची वाढ झाल्याने उत्पादन खर्च अधिक वाढला आहे. त्यामुळे या सर्व खर्चाचा थेट परिणाम मद्याच्या अंतिम किमतीवर होत असल्याचे उद्योग क्षेत्रातील संघटनांनी स्पष्ट केले आहे.मद्य उद्योगाशी संबंधित संघटनांच्या मते जागतिक घडामोडींचाही या परिस्थितीवर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्ष आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
विशेषतः कागदी पुठ्ठ्यांच्या (beware)किमतीत तब्बल १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच एलएनजीच्या तुटवड्यामुळे काचेच्या बाटल्यांचे उत्पादनही प्रभावित झाले आहे. यासोबतच रुपयाच्या घसरणीमुळे आयात होणाऱ्या काही साहित्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे जर राज्य सरकारांनी दरवाढीला परवानगी दिली नाही, तर उद्योगांना तोटा सहन करावा लागू शकतो आणि बाजारात मद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे