घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (decide) तुटवड्यामुळे आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना आता आणखी एक आर्थिक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा देणाऱ्या Swiggy आणि Zomato यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या निर्णयामुळे ग्राहकांना (decide) प्रत्येक ऑर्डरवर अधिक पैसे मोजावे लागणार असून, महागाईच्या पार्श्वभूमीवर याचा थेट परिणाम त्यांच्या खिशावर होणार आहे.सध्या अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असल्याने लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाइन अन्न ऑर्डर करण्याकडे वळत आहेत.
अशा परिस्थितीत प्लॅटफॉर्म (decide) फी वाढवल्याने ग्राहकांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे. कंपन्यांच्या मते, ऑपरेशनल खर्च आणि सेवा सुधारण्यासाठी ही वाढ आवश्यक असल्याचे सांगितले जात असले तरी ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.