एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक(sip provider) हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या निवृत्तीसाठी येथे दीर्घ काळासाठी गुंतवणूक करू शकता आणि चांगला फंड तयार करू शकता. चला जाणून घेऊया.

बचत करण्याची सवय तुम्हाला तरुण वयातच लागली पाहिजे, असं अनेकजण म्हणतात. कारण, तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक करतात तितका तुम्हाला भविष्यात अधिक फायदा होतो. (sip provider)अलिकडे निवृत्तीसाठी तरुण मंडळी तिशीतच प्लॅनिंग करतात. याचाच अर्थ असा की पेन्शन असो वा नसो तुमचा निधी हा निवृत्तीपर्यंत तयार असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फॉर्म्युल्याविषयीची माहिती देणार आहोत. यात तुम्हाला तब्बल 3 कोटींपर्यंत पैसे जमवता येईल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
प्रत्येक व्यक्तीने गुंतवणूक केलीच पाहिजे. गुंतवणुकीतून तुम्ही तुमचे भविष्य तर सुरक्षित करताच, पण एक चांगला निधीही जोडतो, जो कठीण काळात आणि निवृत्तीनंतर उपयोगी पडतो. प्रत्येक व्यक्तीने तरुणपणापासूनच गुंतवणुकीला सुरुवात केली पाहिजे आणि निवृत्तीचे नियोजनही केले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशा गुंतवणुकीच्या फॉर्म्युल्याबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत 3 कोटींचा फंड गोळा करू शकता. आम्ही म्युच्युअल फंड एसआयपीबद्दल बोलत आहोत.
म्युच्युअल फंड एसआयपीसह रिटायरमेंट फंड तयार करा
एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. म्युच्युअल फंड एसआयपीचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्ही दरमहिन्याला थोडी फार गुंतवणूक करून कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला तुमची गुंतवणूक दीर्घकाळ सुरू ठेवावी लागते.
म्युच्युअल फंड एसआयपीतून तीन कोटींचा निधी
जर तुम्ही आता 25 वर्षांचे असाल तर तुम्ही तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंग आतापासूनच सुरू केले पाहिजे. म्युच्युअल फंड एसआयपीची खास गोष्ट म्हणजे यात तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागत नाही, फक्त थोडीशी गुंतवणूक करावी लागते. जर तुम्ही दररोज 100 रुपयांची बचत केली आणि म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही 3 कोटी रुपयांपर्यंतचा फंड जोडू शकता.
दररोज 100 रुपयांची बचत केल्यास दरमहा एकूण 3000 रुपयांची बचत होईल. हे 3000 रुपये तुम्हाला म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवावे लागतील. 35 वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत हे चालू ठेवावे लागते. अशा प्रकारे तुम्ही 35 वर्षांत एकूण 12.60 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. जर तुम्हाला 15 टक्के परतावा मिळाला तर तुमच्याकडे एकूण 3.42 कोटी रुपयांचा फंड असेल. यापैकी केवळ 3.29 कोटी रुपये तुमचा नफा असेल.
हेही वाचा :
Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी
मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
मृत्यूनंतरही यातना, अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ Video