मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी राबवण्यात आली आहे.(decision)लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी गाव, तालुका आणि जिल्ह्यात पतसंस्था सुरु करण्याच निर्णय झाला होता. मात्र, आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. जिल्ह्यात एकच पतसंस्था सुरु केली जाणार आहे. यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला मिळून ही पतसंस्था सुरु करणार आहेत.

ही पतसंस्था सुरु करण्यासाठी १५००० प्राथमिक महिला सभासद असायला हवे. याचसोबत १० लाख भांडवल आवश्यक आहे. दरम्यान, पतसंस्थेसाठी कोणीच पुढे येत नसल्याने या निर्णयाला ब्रेक लागला आहे.राज्या शासनाने ८ मार्च २०१९ रोजी परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार निकषात बसणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यात येणार आहे.(decision) यामध्ये वॉर्ड विभागासाठी प्राथमिक महिला सदस्य १००० आण भांडवल १५ लाख रुपये, उर्वरित महानगरपालिका क्षेत्रासाठी प्राथमिक सदस्य ८००, नोंदणी करताना दहा लाख रुपये अशी अट आहे.

दरम्यान, मुंबई, नवी मुंबई महानगरपालिकासाठी दोन हजार आणि नोंदणी करताना ३० लाख रुपये भरायला हवे. तर इतर महापालिका क्षेत्रांसाठी सभासद संस्था १५०० आणि नोंदणी वेळी २० लाख रुपये भरावे लागणार आहेत. परंतु यासाठी कोणत्याही हिला पुढे आल्या नाहीत. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी गावागावात, तालुक्यात पतसंस्था सुरु करण्याचे नियोजित केले होते. (decision)मात्र, महिला अपेक्षेप्रमाणे पुढे आल्या नाहीत. त्यामुळेच आता फक्त जिल्ह्यांमध्ये एक पतसंस्था सुरु करण्याचे नियोजन केले आहे, असं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
50 हजार कोटींच्या ‘लेटरबॉम्ब’ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
5 स्टार हॉटेलमध्ये रुम बुक करून 40 वर्षीय महिलेवर आमदाराकडून लैंगिक अत्याचा
ग्राहकांसाठी आनंदसरी! खिशाचा भार कमी होणार; सोन्याचा आजचा भाव किती ?