पाईप गॅसधारकांनो लक्ष द्या!(piped) ग्राहकांसाठी नवीन नियम जारीदेशातील गॅस वापरात मोठा बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने पाईप नॅचरल गॅस ग्राहकांसाठी नवे नियम जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे.नवीन नियमानुसार, ज्या घरांमध्ये पाईप गॅस कनेक्शन उपलब्ध आहे, त्या ग्राहकांना आता LPG सिलेंडरचा वापर मर्यादित करण्यात येणार आहे.

PNG आणि LPG दोन्ही (piped)सुविधा एकत्र ठेवण्यावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला गेला आहे.सरकारच्या सूचनेनुसार, ज्या भागात PNG सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी ग्राहकांनी हळूहळू PNG कडे वळावे लागणार आहे. काही प्रकरणांमध्ये LPG कनेक्शन सरेंडर करण्याचीही अट लागू होऊ शकते. यासाठी संबंधित ग्राहकांना ठराविक कालावधी दिला जाणार आहे.या निर्णयामागे LPG चा वाढता तुटवडा, आयात खर्च आणि ऊर्जा व्यवस्थापन सुधारण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
PNG ही सुविधा सतत उपलब्ध (piped)राहते, तसेच ती तुलनेने सुरक्षित आणि किफायतशीर मानली जाते.दरम्यान, ज्या भागात अद्याप PNG सुविधा उपलब्ध नाही, त्या ग्राहकांवर या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे अशा नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.सरकारच्या या नव्या निर्णयामुळे भविष्यात घरगुती गॅस वापरात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.