मार्च महिना संपत आला तरीही राज्यातील अनेक महिलांना “लाडकी बहीण” योजनेचा फेब्रुवारी (installment) महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पैसे नेमके कधी जमा होणार, तसेच फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते एकत्र मिळणार का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, राज्य सरकारकडून या (installment) संदर्भात महत्त्वाची हालचाल करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी १५०० रुपयांच्या अनुदानाचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने सुमारे २७७ कोटी रुपये वर्ग करण्यास मंजुरी दिली आहे. हा निधी महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पात वर्ग करण्यात येत असल्यामुळे येत्या काही दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पैसे उशिरा मिळत असल्याने अनेक महिलांमध्ये चिंता वाढली असली, तरी सरकारकडून प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या योजनेचा लाभ सर्वांना मिळणार नाही, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शासनाने ठरवलेल्या निकषांमध्ये बसणाऱ्या आणि ज्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशाच महिलांना हा लाभ दिला जाणार आहे.

ज्या महिलांच्या केवायसीमध्ये त्रुटी आहेत, त्यांनी त्या तातडीने दुरुस्त करणे आवश्यक (installment) आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित महिलांचा योजनेतील लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. एकीकडे निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत फेब्रुवारीचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता असली, तरी लाभ मिळवण्यासाठी पात्रता आणि केवायसी हीच निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा :

ठाणे हादरलं, वर्गणीच्या वादातून डायरेक्ट एकाच्या डोक्यात चॉपरने वार

निवृत्तीनंतर सुरक्षित भविष्यासाठी ‘या’ 5 आर्थिक गोष्टी जाणून घ्या
शहरातील दोन गॅस वितरकांवर कारवाई; जिल्हा पुरवठा कार्यालयाला अहवाल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *