मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका तणावाचा परिणाम आता (Iran-US tension) जगभरात जाणवू लागला आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही विविध प्रकारच्या चर्चा आणि अफवा वेगाने पसरताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये (Iran-US tension) आज सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, ठाणे, कल्याण, परभणी, बीड आणि नांदेड या ठिकाणी नागरिकांनी इंधन संपणार असल्याच्या भीतीने लांबच लांब रांगा लावल्या. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिघडली की पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक लावण्याची वेळ आली. दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे की देशात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र सोशल मीडियावर पसरत असलेल्या चुकीच्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे-कल्याण-डोंबिवली परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण (Iran-US tension) निर्माण झाले, तर दुसरीकडे मुंबईतील काही भागांमध्ये परिस्थिती तुलनेने शांत दिसून आली. पेट्रोल पंपांवर गर्दी नसून नियमित पुरवठा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या सगळ्या परिस्थितीत सोलापुरात एलपीजी गॅसचा तुटवडा मात्र गंभीर बनला आहे. शहरातील अनेक ऑटो एलपीजी पंप मागील दहा दिवसांपासून बंद असल्याने रिक्षाचालकांना मोठा फटका बसत आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे रोजचे उत्पन्न ठप्प झाले आहे आणि आर्थिक अडचणी वाढत आहेत.

नांदेडमध्येही अशाच प्रकारच्या (Iran-US tension) अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्टपणे सांगितले की, शहरात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि व्हायरल होत असलेले मेसेज पूर्णपणे खोटे आहेत. प्रशासनाने नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आणि अनावश्यक साठेबाजी टाळण्याचे आवाहन केले आहे. सध्या एकूण परिस्थिती पाहता, प्रत्यक्षात इंधनाचा तुटवडा नसताना केवळ अफवांमुळे निर्माण झालेली भीतीच राज्यातील गोंधळाला कारणीभूत ठरत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी शांतता राखणे आणि सत्य माहितीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

ठाणे हादरलं, वर्गणीच्या वादातून डायरेक्ट एकाच्या डोक्यात चॉपरने वार

निवृत्तीनंतर सुरक्षित भविष्यासाठी ‘या’ 5 आर्थिक गोष्टी जाणून घ्या
शहरातील दोन गॅस वितरकांवर कारवाई; जिल्हा पुरवठा कार्यालयाला अहवाल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *