जागतिक पातळीवर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता थेट सोन्या-चांदीच्या बाजारावर दिसून येत आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, गुंतवणूकदारांची वाढलेली सावध भूमिका आणि बाजारातील अस्थिरता यामुळे मौल्यवान धातूंमध्ये सतत चढउतार होत आहेत. (gold and silver) काही दिवसांपूर्वी परिस्थिती अधिक तणावपूर्ण असताना सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती, मात्र अलीकडे काही प्रमाणात तणाव कमी झाल्याचे संकेत मिळताच बाजारात वेगवेगळे बदल दिसू लागले आहेत.

आज 27 मार्च रोजी दुपारच्या सत्रात सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा भाव तब्बल 800 रुपयांनी वाढला असून जीएसटीसह तोळ्याला 1 लाख 48 हजार 114 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून खरेदी करण्यापूर्वी अनेकजण प्रतीक्षा करत असल्याचे चित्र दिसत आहे.
याउलट चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव 2 हजार रुपयांनी खाली आला असून जीएसटीसह प्रतिकिलो 2 लाख 39 हजार 990 रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे देशातील प्रसिद्ध खामगाव चांदी बाजारात तर मंदीचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. येथे चांदीचे दर आणखी खाली घसरून सुमारे 2 लाख 20 हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत आले आहेत. (gold and silver) तरीही खरेदीदार आणि गुंतवणूकदारांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे.
या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याचा. चांदीचे दागिने आणि भांडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या गॅसच्या कमतरतेमुळे खामगावमधील अनेक कारखाने गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. जवळपास 20 ते 22 मोठे उत्पादन युनिट ठप्प पडल्यामुळे उत्पादन पूर्णपणे थांबले आहे. (gold and silver) परिणामी बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला असून व्यवहारही मंदावले आहेत. या परिस्थितीमुळे शेकडो कारागिरांच्या रोजगारावर गदा आली आहे.एकूणच जागतिक तणाव, स्थानिक अडचणी आणि बाजारातील अनिश्चितता या तिन्ही घटकांचा परिणाम सध्या सोन्या-चांदीच्या बाजारावर होताना दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांनीही सावध भूमिका घेत बाजारातील पुढील घडामोडींवर लक्ष ठेवणे गरजेचे ठरत आहे.
हेही वाचा :
रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यास कोणते आजार झटक्यात बरे होतात? घ्या जाणून
सोशल मीडियावर मोठा बदल; फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यासाठी करावी लागणार KYC
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांची भरती जाहीर