IPL 2026 स्पर्धेच्या सुरुवातीआधीच एक मोठी ट्रेड डील चर्चेचा विषय ठरली आहे. Chennai Super Kings आणि Rajasthan Royals यांच्यात झालेल्या या अदलाबदलीत Ravindra Jadeja आणि Sanju Samson यांनी संघ बदलला. या निर्णयामुळे दोन्ही संघांच्या रणनीतीत मोठा बदल होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा रवींद्र जडेजावर विश्वास दाखवला आहे. (big trade deal) विशेष म्हणजे 2008 मध्ये आयपीएल जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता, त्यामुळे त्याच्याकडून पुन्हा एकदा विजेतेपदासाठी मोलाचं योगदान अपेक्षित आहे. अनुभव, अष्टपैलू क्षमता आणि मोठ्या सामन्यांचा दबाव हाताळण्याची ताकद यामुळे जडेजा राजस्थानसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे.

स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात (big trade deal) जडेजाने आपल्या फॉर्मची झलक दाखवून दिली. जुरेल 11 विरुद्ध खेळताना त्याने केवळ 34 चेंडूत नाबाद 95 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या फलंदाजीमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. इतकंच नाही तर गोलंदाजीतही त्याने चार विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांना चांगलाच धक्का दिला. या कामगिरीमुळे तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या पार्श्वभूमीवर 30 मार्चला होणाऱ्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (big trade deal) यांच्यातील सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे जडेजा अनेक वर्षे चेन्नईकडून खेळला असल्यामुळे हा सामना त्याच्यासाठी भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्या कामगिरीवर राजस्थानच्या यशाचं समीकरण मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. आयपीएल कारकिर्दीत रवींद्र जडेजाने आतापर्यंत 3260 धावा करत 170 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे आगामी हंगामात तो पुन्हा एकदा आपल्या अष्टपैलू कामगिरीने संघाला विजय मिळवून देऊ शकतो, असा विश्वास चाहत्यांना आहे.

हेही वाचा :

खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार

दिनेश कार्तिक होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक? या खेळाडूने सांगितलं कसं ते
तर त्या शेतकर्‍यांचे फार्मर आयडी बंद , शासकीय योजनांपासून होणार वंचित, चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *