भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. BCCI ने 26 मार्च रोजी टीम इंडियाच्या मायदेशातील आगामी हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलं असून यात अनेक रोमांचक मालिकांचा समावेश आहे. या हंगामात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ एकूण चार संघांविरुद्ध 22 सामने खेळणार आहे, जे देशातील 17 वेगवेगळ्या मैदानांवर पार पडणार आहेत.

इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाच्या मायदेशातील हंगामाची सुरुवात होणार आहे. हा दौरा 19 जुलै 2026 रोजी संपणार असून त्यानंतर भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मेजवानी रंगणार आहे. (Team India) सर्वप्रथम विंडीजविरुद्ध मालिका खेळवली जाणार असून त्यानंतर श्रीलंकेचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. या मालिकांनंतर तब्बल 25 वर्षांनी झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भारत आणि झिंबाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी 2027 मध्ये खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारी रोजी येथे होणार आहे. दुसरा सामना 6 जानेवारीला होईल, तर मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 9 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियम येथे पार पडणार आहे.झिंबाब्वेचा भारत दौरा शेवटचा 2002 साली झाला होता. (Team India) त्या वेळी दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि वनडे मालिका खेळवण्यात आल्या होत्या आणि भारताने दोन्ही मालिकांमध्ये विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा ही ऐतिहासिक लढत रंगणार असल्याने क्रिकेटप्रेमींचं लक्ष या मालिकेकडे लागलं आहे.

विशेष म्हणजे, अलीकडीलआयसीसी पुरुष टी२० विश्वचषकस्पर्धेत झिंबाब्वेने दमदार कामगिरी करत सुपर 8 फेरी गाठली होती. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका सारख्या बलाढ्य संघांना धक्का देत आपली ताकद दाखवून दिली आहे. (Team India) त्यामुळे सिकंदर रझा यांच्या नेतृत्वाखालील झिंबाब्वे संघशुभमन गिल यांच्या टीम इंडियाविरुद्ध कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

हेही वाचा :

रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यास कोणते आजार झटक्यात बरे होतात? घ्या जाणून

सोशल मीडियावर मोठा बदल; फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यासाठी करावी लागणार KYC

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांची भरती जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *