भारतामध्ये स्तनाचा कर्करोग हा महिलांसाठी वाढता आरोग्यधोका ठरत आहे. (Breast cancer) अलीकडील आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार गेल्या तीन दशकांत या आजाराचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले आहे. लॅन्सेट ऑन्कोलॉजी मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, 1990 साली दर एक लाख महिलांमागे 13 प्रकरणे आढळत होती, तर 2024 पर्यंत ही संख्या वाढून 29.4 वर पोहोचली आहे. जर ही वाढ अशीच कायम राहिली, तर 2050 पर्यंत भारतात सुमारे 45 लाख महिलांना या आजाराचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

संशोधनातून असेही स्पष्ट झाले (Breast cancer) आहे की पूर्वी हा आजार प्रामुख्याने 60 वर्षांवरील महिलांमध्ये दिसून येत होता, मात्र आता तरुण महिलांमध्येही त्याचे प्रमाण वाढत आहे. 2023 मधील आकडेवारीनुसार 55 वर्षांवरील महिलांमध्ये प्रति एक लाखांमागे सुमारे 161 प्रकरणे नोंदली गेली. त्याचबरोबर 20 ते 54 वयोगटातील महिलांमध्येही 1990 नंतर सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे हा आजार आता कमी वयातही होण्याचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञांच्या मते, बदलती जीवनशैली हे या वाढीमागील एक मोठे कारण आहे. (Breast cancer) धूम्रपान, तंबाखूचे सेवन, लठ्ठपणा, रक्तातील साखरेची वाढ, असंतुलित आहार, फास्ट फूड आणि लाल मांसाचे जास्त सेवन यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होते. याशिवाय आनुवंशिकता, उशिरा गर्भधारणा, मासिक पाळी लवकर सुरू होणे किंवा उशिरा बंद होणे यांसारखे घटकही धोका वाढवतात. काही प्रकरणांमध्ये लहान वयात घेतलेले रेडिएशन उपचारही कारणीभूत ठरू शकतात.
या आजाराची लक्षणे सुरुवातीला फार ठळक नसतात, त्यामुळे अनेकदा तो उशिरा लक्षात येतो. स्तनात गाठ येणे, त्वचेवर बदल दिसणे, स्तनाचा आकार बदलणे किंवा स्तनाग्रातून स्त्राव होणे ही काही महत्त्वाची लक्षणे मानली जातात. डॉक्टरांच्या मते, वेळेवर निदान झाले तर या आजारावर यशस्वी उपचार शक्य आहेत.
आरोग्य तज्ज्ञ महिलांना नियमित (Breast cancer) स्वतःची तपासणी करण्याचा सल्ला देतात. वयाच्या 20 वर्षांनंतर स्तनांची नियमित तपासणी, संतुलित आहार, दररोज व्यायाम, ताणतणाव कमी ठेवणे आणि तंबाखूपासून दूर राहणे यामुळे या आजाराचा धोका कमी करता येऊ शकतो. बदलत्या जीवनशैलीत योग्य सवयी अंगीकारणे आणि वेळेवर तपासणी करणे हेच या वाढत्या धोक्याविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र ठरू शकते.
हेही वाचा :
खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार