महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या (important decisions) शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कर्जधारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मागील वर्षी जून ते ऑगस्टदरम्यान (important decisions) राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे 20 हून अधिक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी मिळालेली मदत अपुरी असल्याची टीका होत होती आणि अनेक पूरग्रस्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याची नाराजी व्यक्त करत होते. या पार्श्वभूमीवर सरकारने जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी नव्याने मदत जाहीर करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
या नव्या (important decisions) निर्णयांतर्गत मदतीसाठीच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी केवळ अल्प किंवा अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांनाच मदत मिळत होती, मात्र आता सर्वच आपत्तीग्रस्त पशुपालकांना मदतीसाठी पात्र करण्यात आले आहे. तसेच जनावरांच्या मृत्यूबाबत असलेल्या मर्यादाही हटवण्यात आल्या असून, पूरात मृत किंवा बेपत्ता झालेल्या सर्व जनावरांसाठी मदत दिली जाणार आहे.
सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार, मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति (important decisions) जनावर 37,500 रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये आणि लहान जनावरांसाठी 20,000 रुपये दिले जाणार आहेत. शेळी व मेंढीसाठी प्रत्येकी 4,000 रुपयांची मदत मिळणार असून, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति कोंबडी 100 रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय, पूरामुळे पडझड झालेल्या गोठ्यांसाठी 3,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पूरग्रस्त शेतकरी आणि पशुपालकांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, मागील काळातील नाराजी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार