घरात सहज उपलब्ध असलेल्या औषधांच्या गोळ्या आता आरोग्यासाठी धोक्याचा इशारा ठरत असल्याची गंभीर बाब वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडली आहे. डोकेदुखी, अंगदुखी किंवा ताप यांसारख्या किरकोळ तक्रारींवर स्वतःहून औषधे घेण्याची सवय अनेकांमध्ये वाढली असून हीच सवय शरीरासाठी “स्लो पॉयझन” ठरू शकते, असा इशारा दिला जात आहे.

दैनंदिन आयुष्यात अनेकजण पूर्वी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा उरलेला साठा जपून ठेवतात आणि पुन्हा त्याच प्रकारची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला न घेता तीच औषधे घेतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, लक्षणे सारखी असली तरी आजाराचे कारण प्रत्येकवेळी वेगळे असू शकते. (medicine) अशावेळी स्वतःहून घेतलेली औषधे तात्पुरता आराम देतात, पण शरीराच्या अंतर्गत अवयवांवर दीर्घकालीन घातक परिणाम करू शकतात.
विशेषतः वेदनाशामक औषधांचा वारंवार वापर केल्यास किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. अनेक औषधे लिव्हरमध्ये प्रक्रिया होतात आणि त्यांचा अतिरेक झाल्यास लिव्हरला सूज येण्याची शक्यता वाढते. सर्दी-खोकल्यासारख्या साध्या आजारांसाठी अँटीबायोटिक्स घेण्याची सवय भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकते, कारण त्यामुळे शरीरावर औषधांचा परिणाम कमी होतो आणि गंभीर आजारांवर उपचार कठीण होतात.काही औषधांच्या चुकीच्या वापरामुळे शरीरात तीव्र रिऍक्शन होऊ शकते. श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तदाब अचानक कमी होणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय औषधांमुळे मूळ आजाराची लक्षणे दाबली जातात, (medicine) ज्यामुळे कॅन्सर किंवा हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचे निदान उशिरा होते आणि उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात.
तज्ज्ञांच्या मते, औषधांचा वापर करताना त्यांची मुदत तपासणे अत्यंत आवश्यक आहे. मुदत संपलेली औषधे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. (medicine) तसेच औषधे योग्य ठिकाणी साठवणेही महत्त्वाचे आहे, कारण उष्णता किंवा ओलावा यामुळे औषधांचे गुणधर्म बदलू शकतात. कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे हीच सुरक्षिततेची सर्वोत्तम पद्धत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट
मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,