महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसणारी लक्षणं अनेकदा साधी आणि दुर्लक्षित राहतात, मात्र त्यामागे गंभीर धोका दडलेला असू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे थकवा, श्वास घेण्यास त्रास किंवा पोटाशी संबंधित तक्रारी या सामान्य मानल्या जातात. पण डॉक्टरांच्या मते, विशेषतः महिलांनी या संकेतांकडे गांभीर्याने पाहणं अत्यंत गरजेचं आहे.

अनेक वेळा महिलांना अचानक आणि असामान्य थकवा जाणवू लागतो. हा नेहमीचा थकवा नसून, अगदी हलकं काम केल्यानंतरही शरीर पूर्णपणे दमल्यासारखं वाटू शकतं.(women) यामागे हृदयाची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे, पूर्वी सहज करता येणाऱ्या कामांदरम्यान जर श्वास घेणं कठीण होत असेल, तर तेही एक गंभीर संकेत ठरू शकतो. हृदय नीट कार्य करत नसेल, तर फुफ्फुसांमध्ये द्रव साचून श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो.

हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत वेदना असा समज अजूनही अनेकांमध्ये आहे. मात्र प्रत्यक्षात वेदना जबडा, मान, पाठ किंवा हातांमध्येही जाणवू शकतात. या वेदना अचानक आणि कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय होत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. (women) याशिवाय, सतत अपचन, अॅसिडिटी, मळमळ किंवा वरच्या पोटात होणाऱ्या वेदना देखील हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

काही महिलांना अचानक चक्कर येणं, थंड घाम येणं किंवा डोके हलकं झाल्यासारखं वाटणं अशी लक्षणं जाणवतात. ही अवस्था मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात घट झाल्यामुळे निर्माण होते आणि गंभीर ठरू शकते.या सर्व लक्षणांकडे वेळेत लक्ष देणं आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. (women) कारण योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास हार्ट अटॅकसारख्या गंभीर परिस्थितीपासून जीव वाचवता येऊ शकतो.

हेही वाचा :

उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट

मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *