मुंबईतील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहिला(train line) मिळत आहे. इतकेच नाहीतर पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. सध्या पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असून, अनेक (train line) भागांमध्ये पाणी साचलं आहे. या मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेला मोठा फटका बसला आहे. ठाण्यात पडणाऱ्या या पावसामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. रेल्वेगाड्या अर्धा तास उशिराने धावणार आहेत.

हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांना पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच मध्य रेल्वे अर्धा तास उशिराने धावणार आहे. मुंबईतील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहिला मिळत आहे. इतकेच नाहीतर पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत. याचा मुंबईतील चाकरमान्यांना फटका बसणार आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली, रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड नदी, वाघोटण नदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चुनाभट्टी, कुर्ला रेल्वे रुळांवर पाणीच पाणी
मुंबईत पावसाचा जोर वाढला असून, मध्य आणि हार्बर रेल्वे सेवेवर मंगळवारी पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. कुर्ला, सायन, चुनाभट्टी येथे रुळांवर पाणी भरले आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाले आहेत. मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता.

मुंबईतील जनजीवन विस्कळीत
सततच्या पावसामुळे मुंबईतील परिस्थिती आणखी बिकट झाली होती. शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. खाजगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले होते. अनेक भागात पाणी साचले होते आणि वाहतुकीवर परिणाम झाला होता.

हेही वाचा :

मुंबईत पावसाचा जोर ओसरला, पुढील 3 तासांचा अंदाज काय?

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

पावसाचा तडाखा! मध्य आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *