गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर मुंबईत आज(mumbai) पावसाचा जोर कमी झाला आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर झालेल्या विस्कळीततेमुळे नागरिकांना मोठा त्रास झाला होता. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तरीही हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि रेल्वे सेवा अजूनही विस्कळीत आहे.

गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आज मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिमझिम पाऊस सुरू आहे.(mumbai) गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. काही ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. पण आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून, शहरात फक्त रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
मुंबईत संततधार पावसानंतर आज पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांनी पुढील काही तास आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सलग तिसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याण स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या अर्धा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. यामुळे कामावर निघालेले नोकरदार आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. तीन दिवसांच्या सतत पावसानंतरही, वीरा देसाई रोडवर अजूनही पाणी साचलेले आहे. पण पाऊस थांबल्यामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे.
दरम्यान आज सकाळपासून कमी पाऊस पडल्यामुळे मुंबई उपनगरात कुठेही पाणी साचलेले नाही. परंतु हवामान विभागाने आजही अलर्ट जारी केला आहे आणि मुंबईसह उपनगरात पावसाचा इशारा दिला आहे. ठाणे ते वाशी अप आणि डाऊन लोकल सात ते आठ मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे मध्य रेल्वे दहा मिनिटे उशिरा धावत आहे. पश्चिम रेल्वेमध्ये, विरार ते चर्चगेट ही ट्रेन थोडी उशिराने धावत आहे. विरार ते चर्चगेट गाड्या 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. बोरिवली ते चर्चगेट ही ट्रेन देखील ५ मिनिटे उशिराने धावत आहे.
हेही वाचा :
फक्त 1 सामन्याचाच अनुभव, तरीही संधी का? कॅप्टन सूर्यकुमार यादव म्हणाला…
गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
अवघी 10 मिनिटं अन् 6 साहित्य… लगेचच तयार होईल चविष्ट हॉट चॉकलेट केक, रेसिपी आहे खूपच सोपी