मुंबईमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार (rains)पाऊस होताना दिसतोय. याचा परिणाम थेट मुंबईच्या लोकलवर झालाय. काल मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. आजरी रेल्वे उशिराने धावत आहे.

मुंबईसह राज्यामध्ये मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. मुंबईच्या रस्त्यांना नद्यांची स्वरूप आले. काल गुडघ्याभर पाण्यातून रस्ता काढत लोकांना जाण्याची वेळ आली होती. (rains)मुसळधार पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याण स्थानकावर प्रचंड गर्दी बघायला मिळतंय. लोकल गाड्या अर्धा तास उशिराने असल्याने प्रवाशी आणि चाकरमाने संतप्त होताना दिसत आहेत. मध्य रेल्वे कालच्या पावसामध्ये बंद होतील. मुसळधार पावसामुळे अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. कल्याण CSMT मार्गावरील गाड्या अर्धा तास उशिराने सुरू असल्याने कल्याण स्थानकावर प्रचंड गर्दी आहे.
मध्य रेल्वे सहहार्बर रेल्वे देखील उशिराने सुरू आहे. सीएसटीकडून पनवेलला जाणाऱ्या लोकल गाड्या 8 ते 10 मिनिटे उशिराने तर पनवेल वरून येणाऱ्या गड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तीन दिवसांच्या सतत पावसानंतर, आज थोडीशी विश्रांती पावसाने घेतली आहे. मुंबई उपनगरात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. अंधेरी सबवे देखील सुरू आहे. सकाळची वेळ आहे, पश्चिम द्रुतगती महामार्ग देखील सुरू आहे, पश्चिम रेल्वे देखील वेळेवर धावत आहे.
आज सकाळपासून कमी पाऊस पडल्यामुळे मुंबई उपनगरात कुठेही पाणी साचलेले नाही. परंतु हवामान विभागाने आजही अलर्ट जारी केला आहे आणि मुंबईसह उपनगरात पावसाचा इशारा दिला आहे. ठाणे ते वाशी अप आणि डाऊन लोकल सात ते आठ मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे मध्य रेल्वे दहा मिनिटे उशिरा धावत आहे. पश्चिम रेल्वेमध्ये, विरार ते चर्चगेट ही ट्रेन थोडी उशिराने धावत आहे. विरार ते चर्चगेट गाड्या 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. बोरिवली ते चर्चगेट ही ट्रेन देखील ५ मिनिटे उशिराने धावत आहे.
तीन दिवसांच्या सतत पावसानंतर, पावसाने आज थोडीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, वीरा देसाई रोड वरती अजून ही पाणी साचलेले आहे पाण्याचा निचरा झालेला नाही. रीप रीप पावसाला सुरवात झाली आहे, येथे वाहतूक सुरु आहे वाहतूक कुठे ही विस्कळीत झालेली नाही. हवामान विभागाने मुंबईत आजही रेड अलर्ट जारी केला आहे आणि मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा :
फक्त 1 सामन्याचाच अनुभव, तरीही संधी का? कॅप्टन सूर्यकुमार यादव म्हणाला…
गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
अवघी 10 मिनिटं अन् 6 साहित्य… लगेचच तयार होईल चविष्ट हॉट चॉकलेट केक, रेसिपी आहे खूपच सोपी