दिवंगत अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले.(setback) बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांचेच मत होते. पण काँग्रेसने निवडणुका आणि सहानुभूती असे दोन्ही वेगळे मुद्दे असल्याचे अधोरेखित केले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. वंचित आघाडीने अगोदरच काँग्रेसला सहकार्याची भूमिका घेतली आहे. तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना यामुळे धक्का लागल्याचे मानले जात आहे.

बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यास काँग्रेस (setback) पक्षाने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखतीही काँग्रेसने घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान उमेदवाराची घोषणा करण्यापूर्वी काँग्रेस मित्रपक्षाशी चर्चा करणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार की काँग्रेस म्हणून पक्ष निवडणूक लढणार आणि इतर पक्ष तटस्थ भूमिका घेणार हे लवकरच समोर येईल.
बारामती आणि राहुरी मतदारसंघात इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. (setback)बारामतीमधून 6 उमेदवारांचे अर्ज मिळाले आहेत. तर राहुरी मतदारसंघासाठी काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी 4 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या आहेत. दोन्ही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. एक-दोन दिवसात उमेदवाराची घोषणा होईल, असा संदेश आम्ही इच्छुकांना दिला आहे. राष्ट्रवादी जर निवडणूक लढणार नसेल तर काँग्रेस ही निवडणूक लढण्यास तयार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम
30 मार्च 2026 रोजी बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
7 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी
9 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत
23 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान
4 मे रोजी मतमोजणी आणि निकाल
6 मे रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी